शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंह मोहिते-पाटलांसह चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: March 2, 2016 00:04 IST

सुमित्रा पतसंस्था घोटाळा : लिपिक आत्महत्या प्रकरण

सुमित्रा पतसंस्था घोटाळा : लिपिक आत्महत्या प्रकरण
सोलापूर : अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेतील लिपिक दिनकर दगडू भोसले याच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्यासह चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी सोमवारी फेटाळला.
संचालक सुभाष रामलिंग दळवी, विजय विश्वनाथ शिंदे आणि मनोज भारत रेळेकर अशी अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या अन्य तिघांची नावे आहेत. सुमित्रा पतसंस्थेत भोसले हा लिपिक म्हणून कार्यरत होता. आरोपींनी त्याच्यावर अपहार केल्याचा ठपका ठेवत त्याची खोमनाथ (ता. मंगळवेढा) येथील शेतजमीन तसेच पत्नीच्या नावे असलेली खंडाळी येथील जमिनीची विक्री करून ८१ लाख रुपये पतसंस्थेत जमा करून घेतले. परंतु केवळ ४१ लाखांची पावती दिली. याशिवाय भोसले याची अकलूज येथील सुजय नगरातील वडिलोपार्जित दुमजली इमारतीची किमत ६० ते ७० लाख रुपये असताना ती ३ लाख ८० हजार रुपयांमध्ये विकण्यास भाग पाडले.
आणखी रक्कम किती येणे आहे, त्याचा हिशोब न देता आरोपी सतत मानसिक त्रास देत होते. त्यामुळे पत्नीची पुणे येथे बदली करून घेतल्यानंतरही तिच्या नावे चेक घेऊन फौजदारी खटला दाखल करण्याची धमकी दिली. आरोपींच्या या सततच्या छळास कंटाळून दिनकर भोसले याने १२ जानेवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विष प्राशन करून आत्महत्या केली. पत्नी कल्याणी भोसले हिने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)