शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

पान बहारने जेम्स बाँडला गंडवलं

By admin | Updated: October 21, 2016 13:38 IST

'पान बहार'ने सर्व प्रॉडक्टसाठी आपल्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन गैरसमज पसरवला आहे',असा आरोप पिअर्स ब्रॉस्ननने केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली - 'जेम्स बाँड'च्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला हॉलिवूडचा स्टार पिअर्स ब्रॉस्ननवर 'पान बहार'ची जाहिरात केल्यामुळे सर्व स्तरातून टीका होत आहे. मात्र या कंपनीने जाहिरातींद्वारे 'जेम्स बाँड' पिअर्स ब्रॉस्ननला गंडवल्याचे समोर येत आहे. 'पान बहारने त्यांच्या सर्व प्रॉडक्टसाठी आपल्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे, तसेच त्याद्वारे गैरसमजदेखील पसरत आहे', असा आरोप पिअर्स ब्रॉस्ननने केला आहे. पान बहारच्या प्रॉडक्टमध्ये शरीराला हानीकारक असलेल्या घटकांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रॉडक्टवरील आपण फोटो काढण्याची मागणीदेखील केल्याचे पिअर्सने सांगितले आहे. 
 
कंपनीकडून अनधिकृतरित्या माझ्या चेह-याचा गैरवापर होत असल्याने मला स्वतःला धक्का बसल्याचेही पिअसर्न म्हटले आहे. 'तंबाखू, सुपारी यासारख्या शरीराला हानीकारक असणा-या घटकांचा समावेश नसलेल्या 'ब्रेथ फ्रेशनर' या एकाच प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी सहमती दर्शवली होती', असे पिअर्स ब्रॉस्ननने एका प्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 
आणखी बातम्या
 
'खासगी आयुष्यात मी माझी पत्नी, मुलगी आणि अनेक मित्रांना कॅन्सरमुळे गमावून बसलो आहे, असे असताना मी कॅन्सरसाठी जबाबदार असणा-या प्रॉडक्टची जाहिरात कशी करेन?,  यामुळे केवळ आरोग्य सुधारण्यास मदत करतील, अशाच प्रॉडक्टच्या जाहिराती करण्याचे ठरवले आहे', असे स्पष्टीकरणही त्याने दिले आहे. 'मला भारत आणि भारतीयांप्रती खूप प्रेम आणि जिव्हाळा आहे. त्यामुळे यापुढे आरोग्याला हानीकारक असलेल्या कुठल्याही प्रॉडक्टची जाहिरात करणार नाही, असे सांगत त्याने भारतीयांची माफी मागितली आहे.