शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी जबाबदारीमुळे जेटलींपुढे पेच

By admin | Updated: March 24, 2017 00:26 IST

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाचा अतिरिक्त पदभार आल्यापासून ते कठीण परिस्थितीतून जात असल्याचे दिसत आहे.

हरीश गुप्ता / नवी दिल्ली अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाचा अतिरिक्त पदभार आल्यापासून ते कठीण परिस्थितीतून जात असल्याचे दिसत आहे. मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जेटली यांच्याकडे हे खाते आले आहे. पण, त्यांना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. पंतप्रधान कार्यालय किंवा अन्य कोणत्याही मंत्रालयाशी चर्चा न करता २००० कोटी रुपयांपर्यंतचे शस्त्र खरेदी करण्याचे अधिकार जेटली यांना या निमित्ताने मिळाले आहेत आणि त्यामुळेच जेटलींसाठी ही कसरतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्रीकर संरक्षण मंत्री असतांनाच पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्र्यांच्या अखत्यारितील शस्त्र खरेदीची मर्यादा ५०० कोटींवरून २००० कोटी रुपये केली आहे. एका आदेशानुसार, मोदी यांनी असे निर्देश दिले होते की, संरक्षण आणि अर्थ मंत्रालयाचे संयुक्त आर्थिक अधिकार ३००० कोटी रुयपयांचे असतील. संरक्षण उपकरण खरेदी करण्यासाठी अर्थ आणि संरक्षण मंत्रालयाला पंतप्रधान कार्यालय किंवा कॅबिनेटकडे जाण्याची गरज नाही. ३००० कोटी रुपयांपर्यंतच्या खरेदीचे अधिकार या दोन मंत्रालयाकडे देण्यात आले आहेत. या प्रमुख मंत्रालयांचे आर्थिक अधिकार वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ पातळीवर घेतला आहे. कमी किंमतीच्या आवश्यक वस्तू खरेदीसाठी कुठल्याही मंजुरीची वाट न पाहता खरेदी करण्याचा आदेशही यापूर्वीच जारी करण्यात आला आहे. अर्थ खात्यासह आता संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी आल्याने अरुण जेटली यांना ३००० कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीचा अधिकार असणार आहे.