शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा परत आणणे हे बिकट काम -शहा

By admin | Updated: January 11, 2015 01:29 IST

काळा पैसा परत आणण्यात अनेक अडचणी आहेत, ते फक्त भारताच्या हातात नाही. कारण अनेक आंतरराष्ट्रीय करार त्यात आडवे येत आहेत.

नवी दिल्ली : परदेशातील काळा पैसा परत आणणे हे काम आंतरराष्ट्रीय करारांपायी बिकट असल्याचे मत व्यक्त करून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी यावर आंतरराष्ट्रीय करारांविषयी तोडगा निघाल्यानंतरच आरोपींना योग्य ती शिक्षा केली जाऊ शकते, अशी भूमिका घेतली आहे. काळा पैसा परत आणण्याच्या निवडणूकपूर्व गर्जना म्हणजे भाजपाने मतदारांची केलेली दिशाभूल होती, या विरोधकांच्या टीकास्त्राच्या पार्श्वभूमीवर शहा यांचे वक्तव्य लक्षणीय आहे.संसदेत महत्त्वपूर्ण विधेयके संमत होऊ न देण्याबाबत विरोधी पक्षावर शरसंधान साधताना त्यांनी देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर होऊ न देण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असेही बजावले. रामलीला मैदानावर आयोजित रॅलीत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात काळ्या पैशाच्या मुद्द्यावर एक वातावरण तयार केले आहे. त्या समस्येवर तोडगा काढण्याकरिता अनेक देश सहमतही झाले आहेत. आंतरराष्ट्रीय करारांबाबत काही तोडगा निघाल्यास भाजपा या गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात यशस्वी होईल, असे प्रतिपादन शहा यांनी पुढे केले. भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत काळ्या पैशांबाबत एका समितीची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आम आदमी पार्टीवर हल्ला चढविताना या पक्षाने खोटे बोलण्याचा विक्रम केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)काळा पैसा परत आणण्यात अनेक अडचणी आहेत, ते फक्त भारताच्या हातात नाही. कारण अनेक आंतरराष्ट्रीय करार त्यात आडवे येत आहेत.- अमित शहा, अध्यक्ष, भाजपा