शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

इसिसचे जाळे उद्ध्वस्त!

By admin | Updated: January 23, 2016 04:17 IST

देशभर होणारे प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम उधळून आणण्यासाठी अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांची शक्यता पाहता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी विविध राज्यांतील पोलीस

नवी दिल्ली : देशभर होणारे प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम उधळून आणण्यासाठी अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांची शक्यता पाहता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी विविध राज्यांतील पोलीस, एटीएस आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांच्या मदतीने देशव्यापी मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच दिवशी ठाण्याच्या मुंब्रा भागातून इसिस समर्थकांचा म्होरका मुदब्बीर शेख उर्फ आमिर याला तर मुंबईच्या माझगाव भागातून खान महम्मद हुसेन या ३६ वर्षीय व्यावसायिकाला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे विविध राज्यांतील १४ इसिस समर्थकांना आणि कर्नाटकमध्ये अल-कायदाशी संबंधित सहा संशयितांच्या मुसक्या बांधण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान दिल्ली, पंजाब, मुंबईसह देशव्यापी अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि उत्तर प्रदेशासह सात राज्यांमध्ये एकाचवेळी मारण्यात आलेल्या छाप्यांत ‘जानूद-उल- खलिफा-ए- हिंद’ या दहशतवादी गटाच्या १४ समर्थकांना ताब्यात घेण्यात आले. इसिससारख्याच कडव्या भूमिकेमुळे या संघटनेने दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मुंब्रा येथे वास्तव्याला असलेल्या मुदब्बीर शेख याला अटक करण्यात आली असून त्याचे यापूर्वी इंडियन मुजाहिदीनशी संबंध राहिल्याची माहिती मिळाली आहे. विदेशी नागरिकांवर हल्ले करण्यासह देशातील महत्त्वपूर्ण संस्था बॉम्बस्फोटाने उडविण्याची जबाबदारी या संघटनेकडे सोपविण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.विविध राज्यांमधील पोलीस दलांशी समन्वय राखत छाप्यांची मोहीम पार पाडण्यात आली. या सर्व १४ जणांना दिल्लीत चौकशीसाठी आणण्यात येत आहे. या गटाची पद्धतशीर रचना तयार असल्याची बाब सखोल प्राथमिक चौकशीत उघड झाली. नव्यानेच स्थापन झालेल्या या गटाला हवालाच्या माध्यमातून विदेशातून पैसा मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. युसूफच्या खात्यात ६ लाख रुपये आॅनलाईन जमा तर आणखी एका जणाकडे १ कोटी रुपयांचे विदेशी चलन आढळून आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.(लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था)कर्नाटकमध्ये अल-कायदाशी संबंधित सहा जणांना अटक करण्यात आल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी सांगितले. अल-कायदाशी संबंध असल्याच्या संशयावरून मदरशातील एका शिक्षकाला अटक करण्यात आल्यानंतर अटकसत्र पार पाडण्यात आले.फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोईस ओलांद हे भारतभेटीवर येणार असतानाच बेंगळुरू येथील फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासाला धमकीपत्र मिळाल्यानंतर कारवाईला वेग देण्यात आला. या संशयितांकडून माहिती मिळविणे सुरू असल्याचे परमेश्वरा यांनी नमूद केले.टॅक्सीचालकाचा मृतदेह आढळल्यामुळे अलर्टपठाणकोट येथून तिघांनी भाड्याने घेतलेल्या टॅक्सीच्या चालकाचा मृतदेह हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्णातील काल्टा ब्रीज येथे २० जानेवारीला आढळल्यामुळे दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे. पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्यानंतर तिघांनी विजयकुमार याची आल्टो कार भाड्याने घेतली होती. तो कांगडा जिल्ह्णातील गग्गाल येथील रहिवासी आहे. कार अद्याप सापडली नसल्यामुळे आम्ही सतर्कतेचा आदेश दिला असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.