शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षण विधेयक रखडणे दुर्दैवी

By admin | Updated: March 6, 2016 03:24 IST

संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक आजपर्यंत संसदेत मंजूर होऊ शकले नाही, यासारखी खेदाची बाब नाही.

नवी दिल्ली : संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक आजपर्यंत संसदेत मंजूर होऊ शकले नाही, यासारखी खेदाची बाब नाही. हे विधेयक मंजूर करणे आणि त्याचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करण्यास मदत करणे ही सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी केले. संसदेत लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आयोजित विधानसभा व विधान परिषदेतील महिला सदस्यांच्या संमेलनात ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मोदी उपस्थित होते. आपल्या ४३ वर्षांच्या कारकीर्दीत महिला आरक्षणासंबंधी प्रयत्नांचा उल्लेख करीत राष्ट्रपती म्हणाले, संसदेच्या एका सभागृहात दोन तृतीयांश सदस्यांनी मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक दुसऱ्या सभागृहात व राज्यांच्या विधिमंडळांमध्ये अद्याप मंजूर होऊ शकत नाही, ही बाब दुर्दैवी आहे. भारतीय राजकारणात विविध राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी पदासाठी आपले उमेदवार निवडतात, संसदेच्या स्थायी समित्यांसाठी सदस्यांची निवड करतात, त्यावेळी या विषयाकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.उद्घाटन सोहळ्यात प्रसून जोशीरचित व शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलेले गीत सादर करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी मात्र भाषण केले नाही. (विशेष प्रतिनिधी)महिलांचे सशक्तीकरण आणि राज्यघटनेने बहाल केलेली समानता प्रदान करण्यासाठी महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणे आवश्यक आहे. असे नमूद करीत राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, देशात आजमितीला १२ लाख ७० हजार निर्वासित महिला आहेत. अनेक राज्यांनी महिलांचे आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे, तर काही राज्ये तसे करण्याच्या मार्गावर आहेत. महिला लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशाच्या लोकसंख्येत महिलांचे प्रमाण ५0 टक्के आहे. मात्र, संसदेत त्यांचे प्रमाण आजवर १२ टक्क्यांच्या पुढे गेलेले नाही.