आरडीजी महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
By admin | Updated: June 3, 2014 00:59 IST
अकोला - राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त करून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून स्वेतलाना संजय निमजे हिने ५९४ (९१.३८ टक्के) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यापाठोपाठ हंसा गोविंद केला हिने ५५१ गुण (८५.६९ टक्के), दिव्या जयसिंह जयवार हिने ५३८ (८२.७६ टक्के) गुण प्राप्त केले आहेत. कला शाखेतून मयूरी यशवंत व्यास हिने ५३७ गुण प्राप्त केले असून, फरीदा आफीक अब्दुल अझीझ हिने ५२५ गुण, निकीता संजय पागृत हिने ५०२ गुण प्राप्त केले आहेत. वाणिज्य शाखेतून कृतिका संजय मालवीया हिने ५६५ गुण प्राप्त केले असून, पूजा हेमनदास रामसिंगांनी हिने ५५८ गुण प्राप्त केले आहेत. अक्षदा मुकेश धुमाळे हिने ५४५ गुण प्राप्त केले आहेत. एमसीव्हीसी शाखेतून जागृती महेंद्र मोरे हिने ५२० गुण
आरडीजी महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
अकोला - राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त करून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून स्वेतलाना संजय निमजे हिने ५९४ (९१.३८ टक्के) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यापाठोपाठ हंसा गोविंद केला हिने ५५१ गुण (८५.६९ टक्के), दिव्या जयसिंह जयवार हिने ५३८ (८२.७६ टक्के) गुण प्राप्त केले आहेत. कला शाखेतून मयूरी यशवंत व्यास हिने ५३७ गुण प्राप्त केले असून, फरीदा आफीक अब्दुल अझीझ हिने ५२५ गुण, निकीता संजय पागृत हिने ५०२ गुण प्राप्त केले आहेत. वाणिज्य शाखेतून कृतिका संजय मालवीया हिने ५६५ गुण प्राप्त केले असून, पूजा हेमनदास रामसिंगांनी हिने ५५८ गुण प्राप्त केले आहेत. अक्षदा मुकेश धुमाळे हिने ५४५ गुण प्राप्त केले आहेत. एमसीव्हीसी शाखेतून जागृती महेंद्र मोरे हिने ५२० गुण प्राप्त केले असून, रुपाली महादेव थोरात हिने ४३२ गुण तर दिलमीतकौर हरनामसिंह रोहेले हिने ४०६ गुण प्राप्त केले आहेत. महाविद्यालयातील कला शाखेचा निकाल ८०.९८ टक्के लागला असून, वाणिज्य शाखा ९३.२२ टक्के, विज्ञान शाखेचा ९५.९३ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे.