शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रथम’सह इस्रोची ‘अष्टो’झेप

By admin | Updated: September 27, 2016 05:29 IST

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी यशस्वीपणे आठ उपग्रह अवकाशात सोडले. देशाची ही आतापर्यंतची सर्वात जास्त वेळ (दोन तास) चाललेली अवकाश मोहीम होती.

श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी यशस्वीपणे आठ उपग्रह अवकाशात सोडले. देशाची ही आतापर्यंतची सर्वात जास्त वेळ (दोन तास) चाललेली अवकाश मोहीम होती. येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-३५ने उड्डाण केले. सगळ््या आठ उपग्रहांना वेगवेगळ््या कक्षांमध्ये सोडण्याचे अभूतपूर्व काम पीएसएलव्ही सी-३५ ने केले. त्यासाठी सव्वादोन तास लागले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील एक उपग्रह आयआयटी, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. भारताचे स्कॅटसॅट-१ आणि इतर देशांच्या पाच उपग्रहांना पीएसएलव्ही प्रक्षेपण यानाने अवकाशात यशस्वीपणे सोडले. हे उपग्रह दोन वेगवेगळ््या अंतराळ कक्षेत सोडण्यात आले आणि इस्रोच्या शिरपेचात हे आणखी एक मानाचे पीस खोवले गेले. (वृत्तसंस्था)स्कॅटसॅट-१ शिवाय कक्षेत सोडलेले दोन उपग्रह हे भारतीय विद्यापीठाचे ‘प्रथम’ आणि ‘पिसॅट’, अल्जेरियाचे तीन-अलसॅट-१ बी, अलसॅट-२ बी आणि अलसॅट-१एन आणि अमेरिका, कॅनडाचे अनुक्रमे पाथफार्इंडर-१ आणि एनएलएस-१९ सोडण्यात आले. हे यश का महत्त्वाचे?इस्रोन म्हटले आहे की, स्कॅटसॅट-१ ओशनसॅट-२ ची पुढची सततची मोहीम आहे. स्कॅटसॅट-१ मुळे हवामानाचे, वादळ कुठे आहे व त्याचा मार्ग कोणता, याचे भाकीत करण्यास मदत होईल. या उपग्रहाचे मोहिमेचे आयुष्य पाच वर्षांचे आहे. इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून, स्कॅटसॅटकडून अवघ्या १८० मिनिटांत माहिती उपलब्ध होणार असल्यामुळे हे यश अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ओशनसॅट-१ आणि ओशनसॅट-२ हे उपग्रह सागरी वाऱ्याची दिशा आणि परिणाम याची माहिती संपूर्ण जगाला देणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.