सिंचन घोटाळ्यातील कंत्राटदार खत्री रूग्णालयात
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
ठाणे : सिंचन घोटाळ्याप्रकरणी अटक केलेला कंत्राटदार नसीर खत्रीची तब्बेत बिघडल्याने त्याला गुरुवारी मध्यरात्री खसगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
सिंचन घोटाळ्यातील कंत्राटदार खत्री रूग्णालयात
ठाणे : सिंचन घोटाळ्याप्रकरणी अटक केलेला कंत्राटदार नसीर खत्रीची तब्बेत बिघडल्याने त्याला गुरुवारी मध्यरात्री खसगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील पेण येथील बाळगंगा धरणातील गैरव्यवहारप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर नसीर खत्री आणि राजेश रेठी यांना अटक करण्यात आली होती. सात दिवस पोलीस कोठडीत मिळालेल्या खत्रीला गुरुवारी मध्यरात्री 12.30च्या सुमारास श्वसनाचा त्रास होऊन छातीस दुखू लागले होते. त्यामुळे त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक (ठाणे) दत्तात्रय कराळे यांनी याला दुजोरा दिला आहे. 50 वर्षीय खत्रीला पूर्वीपासून असा त्रास होत असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले.