शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

इराकी अराजकाची भारताला झळ

By admin | Updated: June 19, 2014 02:35 IST

सुन्नी बंडखोरांच्या हिंसक उठवामुळे इराकमध्ये निर्माण झालेल्या अराजकाच्या परिस्थितीचे चटके भारतालाही बसू लागले आहेत

नवी दिल्ली : सुन्नी बंडखोरांच्या हिंसक उठवामुळे इराकमध्ये निर्माण झालेल्या अराजकाच्या परिस्थितीचे चटके भारतालाही बसू लागले आहेत. उत्तर इराकमधील मोसूल या शहरात एका बांधकाम कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या ४० भारतीय कामगारांचे अपहरण करण्यात आले असून, २४ तास उलटले तरी त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. दुसरीकडे इराकमधील या हिंसक संघर्षामुळे तेलाच्या किमती भडकू लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर आगामी वर्षात त्याचा किमान २० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असे चित्र आहे. यातच बीजी शहरातील इराकच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर बंडखोरांनी हल्ला करून त्यावर जवळजवळ कब्जा केल्याने परिस्थितीचे गांभीर्य व प्रादेशिक स्थैर्य आणि शांततेच्या धोक्यात आणखी भर पडली आहे. बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या तिकरित शहरात काम करणाऱ्या ४४ भारतीय परिचारिका सुरक्षित असल्याचे समाधान व्यक्त केले जात असतानाच मोसूलमध्ये ४० भारतीय कामगारांचे अपहरण झाल्याचे वृत्त आले.परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली. या अराजकाच्या परिस्थितीने पुढील काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती बॅरलला १२५ डॉलरपर्यंत वाढतील आणि त्याचा भारताच्या अर्थसंकल्पावर किमान २० हजार कोटी रुपयांचा जादा बोजा पडेल, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. इराकमधील घटनांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारांत ब्रेन्ट तेलाच्या किमती बॅरेलमागे तीन डॉलरने वाढून ११३ डॉलरवर गेल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)