शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

भानमतीला राष्ट्रपतींकडून निमंत्रण

By admin | Updated: January 6, 2016 23:56 IST

पोटापाण्यासाठी फळे विकणारी, प्रसंगी मोलमजुरी करून गुजराण करणारी अशिक्षित भानमती येत्या २२ जानेवारीला राष्ट्रपती भवनात ‘पाहुणचार’ घेणार आहे

बहराईच (उप्र): पोटापाण्यासाठी फळे विकणारी, प्रसंगी मोलमजुरी करून गुजराण करणारी अशिक्षित भानमती येत्या २२ जानेवारीला राष्ट्रपती भवनात ‘पाहुणचार’ घेणार आहे. अशिक्षित आदिवासी भानमती समाजासाठी नवा आदर्श ठरली आहे. तिच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रपती भवनाने तिला मेजवानीचे निमंत्रण दिले आहे.आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजासाठी नवा आदर्श ठरणाऱ्या १०० महिलांसाठी राष्ट्रपती भवनने मेजवानीचे आयोजन केले आहे. यात भानमतीचा समावेश आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने एका व्होटिंगद्वारे या १०० महिलांची निवड केली. यात बहराईच्या मिहिपुरवा येथील टेडिया या गावात राहणाऱ्या भानमती या अशिक्षित आदिवासी महिलेचाही समावेश आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ती मोलमजुरी करून पोटाची खळगी भरायची. २००५ मध्ये ती ‘डेव्हलपमेंट असोसिएशन फॉर ह्युमन अ‍ॅडव्हान्समेन्ट’ या स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आली आणि यानंतर तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. आपल्या अधिकारांपासून वंचित आदिवासींसाठी काम करणाऱ्या या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यात भानमतीने स्वत:ला झोकून दिले. अशिक्षित असूनही आरटीआय, मानवाधिकार, नरेगा, महिला व बाल कल्याण तसेच दारूमुक्ती अशा अनेक मुद्यांवर ती काम करीत आहे. (वृत्तसंस्था)