शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील गुंतवणूक घटली

By admin | Updated: November 24, 2015 02:15 IST

जमीनजुमला, मालमत्ता (रियल्टी) क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीत देशात गुजरात आणि उत्तर प्रदेशने मोठी लांब उडी घेतली आहे.

लखनौ : जमीनजुमला, मालमत्ता (रियल्टी) क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीत देशात गुजरात आणि उत्तर प्रदेशने मोठी लांब उडी घेतली आहे. गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात १२ लाख कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक झाली असून त्यातील निम्मी महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशात झाली आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण मात्र घटले आहे.उद्योग मंडळ असोचेमने आपल्या ‘रियल इस्टेट गुंतवणूक : राज्यस्तरीय विश्लेषण’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २00४-0५ ते २0१४-१५ या दरम्यान रियल इस्टेट क्षेत्रात खासगी गुंतवणुकीमध्ये उत्तर प्रदेशचा वाटा ०.१ टक्क्यावरून १६ टक्के झाला आहे.गुजरातनेही गेल्या दहा वर्षांत खासगी गुंतवणुकीत १० टक्क्यांची उडी मारली आहे. गेल्या दहा वर्षांतील गुंतवणुकीचा विचार केला, तर महाराष्ट्रात ती घटली आहे. २००४-२००५ आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा वाटा २५.५ टक्के होता, तो २०१४-२०१५ मध्ये २२ टक्केच राहिला. असोचेमचे महासचिव डी. एस. रावत म्हणाले की, आर्थिक परिस्थितीतील सुधारणा, धोरणाला अनुकूल वातावरण, मागणीनुसार योग्य पुरवठा, आकर्षक मूल्यांकन व भांडवल पुरवठ्यात झालेली वाढ खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी आकर्षित करीत आहे. रियल इस्टेट क्षेत्र पुढे जाण्यासाठी असोचेमने अनेक सूचना केल्या आहेत. त्यात रियल इस्टेट विधेयकाला प्राधान्याने संसदेमध्ये मंजुरी द्यावी म्हणजे ग्राहकांचे हित जपले जाईल. केंद्र आणि राज्य सरकारांनी रियल इस्टेट प्रकल्पांच्या मंजुरीसाठी एक खिडकी योजना राबवावी, जमिनीच्या नोंदींचे काम संगणकीकृत करावे आदींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)असोचेमचे महासचिव डी. एस. रावत म्हणाले की, उत्तर प्रदेशात रियल इस्टेट क्षेत्रात जी गुंतवणूक झाली त्यातील ९८ टक्के ही खासगी आहे. त्यानंतर ९२ टक्क्यांसह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर, तर ८९.५ टक्क्यांसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. २००४-०५ ते २०१४-१५ या कालावधीत संपूर्ण देशात रियल इस्टेट क्षेत्रात १४ लाख कोटींची गुंतवणूक झाली. त्यातील ८५ टक्के ही खासगी, तर १५ टक्के ही सार्वजनिक क्षेत्रातून होती, असेही रावत म्हणाले.