शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय तपास करा, अन्यथा आत्महत्या करू

By admin | Updated: March 18, 2015 23:46 IST

आयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाने जनआक्रोश वाढत असतानाच त्यांच्या कुटुंबियांनीही हा घातपात असल्याचा संशय बुधवारी व्यक्त केला.

कुटुंबाचा घातपाताचा आरोप : आयएएस अधिकारी रहस्यमय मृत्यू प्रकरणबंगळुरू: प्रामाणिक आयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाने जनआक्रोश वाढत असतानाच त्यांच्या कुटुंबियांनीही हा घातपात असल्याचा संशय बुधवारी व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; अन्यथा आत्महत्या करू, अशी धमकीही दिली.कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दुसऱ्या दिवशीही सीबीआय चौकशीची मागणी करीत गदारोळ केला. मृत रवी यांच्या कुटुंबियांनी आज अचानक राज्य सचिवालय विधानसौध येथे धरणे दिले. रवी आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हते, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु प्राथमिकदृष्ट्या हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. धरणे देणाऱ्यांमध्ये रवी यांचे वडील करियप्पा, आई गौरम्मा आणि भाऊ रमेश यांचा समावेश होता. ३५ वर्षीय तरुण आयएएस अधिकारी डी.के. रवी सोमवारी त्यांच्या शहरातील फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे सांगितले. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या सुपूर्द केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरकारने सीआयडीचे महानिरीक्षक प्रणव मोहंती यांची बदली करून त्यांच्या जागी सी.एच. प्रताप रेड्डी यांची नियुक्ती केली आहे. (वृत्तसंस्था)आम्हाला न्याय हवा‘आम्हाला कुणालाही भेटायची इच्छा नाही. आम्हाला न्याय हवा आहे आणि न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू.’-गौरम्मा, डी.के. रवी यांची आईबंगळुरू येथे विधानसौंधपुढे रवी यांची आई गौरम्मा आणि वडील करिअप्पा यांनी धरणे दिली.रवी यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात आढळून आले आहे. मृत्यूपूर्वी त्यांची कुणासोबत झटपट झाल्याचीही चिन्हे नाहीत. त्यामुळे रवी यांनी आत्महत्या केल्याचेच स्पष्ट होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.