शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

बालविकास केंद्रे सुरू, वाळू वापर परवानगी, जलयुक्तचे अधिकार जिल्हा परिषदेला द्या, ठराव संमत

By admin | Updated: February 12, 2016 22:57 IST

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा :

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : नाशिक : कुपोषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली ग्राम बालविकास केंद्रे तत्काळ सुरू करण्यात यावीत. निधी वेळेत खर्च होण्यासाठी महसूल यंत्रणेकडून वाळू वापरावर आणण्यात येणारे निर्बंध शिथिल करण्यात यावेत, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जलयुक्त शिवार अभियान योजना राबविण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला द्यावेत, यांसह अनेक महत्त्वपूर्ण ठराव शुक्रवारी(दि.१२) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली.नवीन प्रशासकीय इमारतीत मागील तहकूब सभा शुक्रवारी घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच प्रवीण जाधव यांनी सियाचीनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दहा भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा तसेच मजूर संघावर अविरोध निवड झाल्याबाबत संपतराव सकाळे यांच्या अभिनंदनाचा असे दोन ठराव मांडले. तसेच जिल्हा परिषदेच्या उपाहारगृह भाडेतत्त्वावर देण्याचा गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर निर्णय होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत निविदा काढली असता दोन निविदा प्राप्त झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी दिली. मनीषा बोडके व गोरख बोडके यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांना व प्राथमिक शाळांना वाणिज्य दराने वीज बिल आकारण्यात ते घरगुती वापराबाबत नुकताच शासन निर्णय झाल्याची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी याबाबत जेथून देयक तयार होते, तेथे याबाबत पत्र देऊन वीज देयके कमी करण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी प्रवीण जाधव यांनी १ मार्चपासून मराठवाड्यात दुष्काळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना सु˜ी जाहीर करण्यात आली असून, नाशिकलाही काही भागांत दुष्काळ असल्याने नाशिकमध्येही १ मार्चपासून शाळांना सु˜ी देण्याचा ठराव मांडला. कृषी विभागाच्या सौर कंदील खरेदीच्या मुद्द्यावरून हा प्रस्ताव आधी नियमानुसार अर्थसमितीवर मंजूर होणे आवश्यक असल्याचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी सांगितले, तर कृषी सभापती केदा अहेर यांनी योजना ठरविण्याचे अधिकार समितीला आहेत, असे स्पष्ट केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी हा विषय समितीच्या अंतर्गत निर्णय असल्याचे सांगितले. प्रा. अनिल पाटील यांनी शाळा निर्लेखनाबाबत शिक्षण विभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून बेफिकीरी सुरू असून, महिन्याभरात या शाळा निर्लेखित न झाल्यास या शाळा लोकसहभागातून उभारण्यात येईल, असा इशारा दिला. याबाबत निर्लेखनाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना दिले. (प्रतिनिधी)