शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मनविसेच्या नव्या फळीसाठी मुलाखती

By admin | Updated: March 24, 2015 23:48 IST

अमित ठाकरेची उपस्थिती : जिल्हाभरातून कार्यकर्त्यांची हजेरी

अमित ठाकरेची उपस्थिती : जिल्हाभरातून कार्यकर्त्यांची हजेरीनाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून, प्रत्येक जिल्‘ांमध्ये मनविसेची नवी फळी तयार करण्यासाठी मुलाखत सत्र राबविण्यास सुरुवात केली आहे. आज नाशिकमध्ये जिल्हा व शहर कार्यकारिणीसाठी त्यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीनंतर मनविसेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याने कार्यकारिणीतील अनेक पदे रिक्त होती. या पदांवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी अमित ठाकरे यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधून, त्यांची मते जाणून घेतली. यावेळी पक्षातील सहभाग, जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता, पक्षवाढीसाठी प्रयत्न आदि प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षात घेता उद्याही (दि.२५) मुलाखतीचे सत्र सुरूच राहणार आहे. मुलाखती घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला जाणार असून, त्यानंतरच पदांची घोषणा केली जाणार असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, खंडेराव मेढे, प्रकाश कोरडे, संदीप भवर, सागर देवरे, मनोज रामराजे, महेश ओवे आदि उपस्थित होते. ---इन्फोरुग्णवाहिकेचे उद्घाटनरुग्ण सेवेसाठी मनसेच्या वतीने सुरू केलेल्या रुग्णवाहिका सेवेचे यावेळी अमित ठाकरे व आदित्य शिरोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रुग्णवाहिका नाशिककरांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. फोटो क्र. २४ पीएचएमआर २०५मनविसे कार्यकारिणीसाठी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेताना मनविसे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर. समवेत अमित ठाकरे, महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष राहुल ढिकले.