कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे वस्नेद्योग मंत्री श्यामापद मुखर्जी आणि अभिनेत्री अपर्णा सेन यांची शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशी केली.
सेन एका मासिकाच्या संपादिका होत्या. मासिक चालवणारा हा ग्रुप सध्या बंद अवस्थेत आहेत. संपादक म्हणून पुरस्कारप्राप्त अभिनेत्री व दिग्दर्शक अपर्णा सेन यांचा मनी लॉन्ड्रिग कायद्यानुसार जबाब नोंदवण्यात आला.
याशिवाय ईडीने 2क्क्9 मधील मालमत्ता विक्री प्रकरणी मुखर्जी यांची चौकशी केली.
मुखर्जी यांच्यावर काही मालमत्तेचे हस्तांतरण करून भांडवल उभे केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, त्यांच्यावरील अवैध व्यवहाराचे सर्व आरोप निराधार आहेत, असे मुखर्जी यांचे वकील जोयजेब दास म्हणाले.
शारदा चिटफंड प्रकरणात अनेक पातळ्यांवर व्यवहार झाला. बहुतांश कंपन्या केवळ कागदावर असून, 224 कंपन्यांपैकी केवळ 17 कंपन्या कार्यरत असल्याचे चौकशी संस्थेला आढळून आले. (वृत्तसंस्था)