शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

विरोध डावलून विमा विधेयक लोकसभेत मंजूर

By admin | Updated: March 5, 2015 01:16 IST

संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये मांडण्यात आलेल्या विमा कायदा दुरुस्ती विधेयकाची प्रत सभागृह सदस्यांना मिळाली आहे.

नवी दिल्ली : आधीचे विमा विधेयक राज्यसभेत प्रलंबित असताना पुन्हा विमा क्षेत्रातील विदेशी थेट गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी यासंदर्भातील कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक लोकसभेत मांडल्याबद्दल विरोधकांनी बुधवारी सरकारवर जोरदार हल्ला चढविला.राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करताना माकपचे सदस्य पी. राजीव म्हणाले की, संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये मांडण्यात आलेल्या विमा कायदा दुरुस्ती विधेयकाची प्रत सभागृह सदस्यांना मिळाली आहे. कोणतेही विधेयक एका सभागृहात मांडले जाऊ शकते, असे राज्यघटनेच्या कलम १०७ मध्ये म्हटलेले आहे. दोन्ही सभागृहांचे मिळून एक विधेयक सादर करणे, असा याचा अर्थ आहे. राज्यसभेत आधीच विमा विधेयक प्रलंबित आहे. हे विधेयक राज्यसभेची मालमत्ता आहे. त्याचा निकाल लागल्याश्विाय लोकसभेत दुसरे त्यासारखेच विधेयक मांडले जाऊ शकत नाही. या सभागृहाची मालमत्ता दुसऱ्या सभागृहात कशी काय सादर केली जाऊ शकते? त्यावर उपसभागती पी.जे. कुरियन म्हणाले की, ‘सदस्यांनी मंगळवारीही हाच मुद्दा उपस्थित केला होता आणि संवैधानिक तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी आपण आपला निर्णय राखून ठेवला होता. मला संवैधानिक तरतुदींचा अभ्यास करावा लागेल व त्यानंतरच मी आपला निर्णय देईल.’ तथापि, या मुद्यावर तात्काळ निर्णय देण्याचा आग्रह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी धरला. तात्काळ निर्णय दिला नाही तर चुकीचा पायंडा पडेल, असे विरोधकांचे म्हणणे होते. त्यानंतर कुरियन यांनी, आपण याबाबत लवकरच निर्णय देणार असल्याचे जाहीर केले. (लोकमत न्यूज नेटवर्क) च्लोकसभेत कोळसा खाण (विशेष तरतूद) विधेयक २०१५ मंजूर करण्यात आले. हे विधेयक यासंदर्भातील एका वटहुकमाचे स्थान घेईल. यात सर्व राज्यांच्या हिताची काळजी घेण्यात आली आहे व हे अर्थव्यवस्थेला बळकटी प्रदान करण्यासोबतच राज्यांनाही सुदृढ बनविणार आहे, असे कोळसामंत्री पीयूष गोयल यांनी या विधेयकावरील चर्चेवेळी सांगितले.च्कोल इंडिया लिमिटेडचे खासगीकरण करण्यात येईल, ही विरोधकांची भीती अनाठायी आहे. कोल इंडियाला अधिक बळकट बनविण्याची सरकारची इच्छा आहे, असे गोयल यांनी स्पष्ट केले.च्कोळसा खाणींच्या वाटपात झालेल्या गैरप्रकारानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे वाटप रद्द केले होते. त्यानंतर या क्षेत्रासाठी एक वटहुकूम काढण्यात आला होता. संसदेत होळी... संसद परिसरात बुधवारी खासदारांनी होळी साजरी केली. जगदंबिका पाल यांना रंग लावताना अभिनेत्री आणि खा. किरण खेर.