शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

कोळिंद्रेत मातब्बर उमेदवारांकडून चाचपणी

By admin | Updated: December 21, 2016 22:25 IST

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला : तालुक्यात कारखाना निवडणुकीपासून महाआघाडीची लाट, राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा --राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या कोळिंद्रे जि. प. मतदारसंघात मातब्बर उमेदवारांनी तयारी चालविल्याने व तालुक्यात कारखाना निवडणुकीत महाआघाडीची लाट असल्याने राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारच नाहीत, अशी विचित्र परिस्थिती कोळिंद्रे जि. प. मतदारसंघात असताना महाआघाडीकडून आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता रमेश रेडेकर व हिराबाई विष्णुपंत केसरकर यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. माजी जि. प. सदस्या श्रीमती अंजनाताई रेडेकर यावेळी चालून आलेली संधी सोडतील, असे दिसत नाही. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर विद्यमान सदस्या संजीवनी गुरव राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.गेल्या पाच वर्षांत विष्णुपंत केसरकर यांनी आपल्या पंचायत समिती सभापतिपदाची ताकद लावून बऱ्यापैकी विकासकामे केली आहेत; परंतु नशिबाने त्यांना यावेळी साथ न दिल्याने आरक्षण महिला राखीव प्रवर्गाकडे गेल्याने आपोआपच ते स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. रमेश रेडेकर यांनीही या मतदारसंघात चांगलीच मशागत केली आहे. दोघांनीही यावेळी महाआघाडीकडून अनुक्रमे हिरा केसरकर व सुनीता रेडेकर यांची नावे पुढे केली आहेत. दोघेही आपल्या निर्णयावर ठाम आहेत, असे सध्या तरी दिसते. तर केदारी रेडेकर संस्था समूहाच्या सर्वेसर्वा श्रीमती अंजनाताई रेडेकर ही संधी सोडणार नाहीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.एकेकाळी तीन मातब्बर उमेदवार रिंगणात दिसत असताना राष्ट्रवादी मात्र उमेदवाराच्या शोधात आहे. गुरव या राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्या तरी केसरकर, रेडेकर यांची ताकद यावेळी त्यांच्यामागे राहणार नसल्याने विजयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बरीच दमछाक होणार आहे.पक्ष म्हणून राष्ट्रवादी इतरांच्या तुलनेत या मतदारसंघात आजही भक्कम अवस्थेत आहे; परंतु कार्यकर्त्यांचे आपापल्या नेत्यांवरचे प्रेम कायम असल्याने कार्यकर्ते निष्ठेने पक्षाच्या ‘अधिकृत’ उमेदवाराच्या पाठीशी कितपत राहणार, यावर यशापयश अवलंबून राहणार आहे.या मतदारसंघात गमतीचा भाग म्हणजे गजरगाव व मलिग्रे पंचायत समिती उमेदवारीची चर्चाही दिसत नाही. याऊलट प्रत्येकजण जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी करू लागला आहे. श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा एकमेव अपवाद वगळता राष्ट्रवादीचेच वर्चस्व या मतदारसंघावर राहिले आहे. राष्ट्रवादीचे नेते या मतदारसंघात किती गांभीर्याने लक्ष घालणार, यावरही येथील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. कदाचित राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात उमेदवारीबाबत ऐनवेळी धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोळींद्रेन्यायालयात दादसलग दुसऱ्यावेळी या जि. प. मतदारसंघात महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे याप्रकरणी यशवंत गिरी यांनी न्यायालयात दाद मागितली असून, न्यायालयीन निर्णयावरही येथील समीकरणे अवलंबून आहेत.महाआघाडीची ताकदविष्णुपंत केसरकर, रमेश रेडेकर, दिगंबर देसाई, राजू होलम, आनंदराव कुलकर्णी, विकास बागडी.विरोधी ताकदअल्बर्ट डिसोझा, सुभाष देसाई, अनिल फडके, महादेव पोवार, मसणू सुतार, संभाजी पाटील, विजय देसाई, विलास पाटील.जि.प. संभाव्य उमेदवारहिराबाई केसरकर (महाआघाडी/अपक्ष), सुनीता रेडेकर (महाआघाडी/ अपक्ष), संजीवनी गुरव (राष्ट्रवादी), अंजना रेडेकर (राष्ट्रीय काँगे्रस)विधानसभेत राष्ट्रवादीला कौलगेली १५ वर्षे विधानसभा निवडणुकीत या जि.प. मतदारसंघाने राष्ट्रवादी काँगे्रसला मताधिक्य दिले आहे. काँगे्रस, सेना यांना या मतदारसंघात फारसा करिश्मा दाखविता आलेला नाही.राष्ट्रवादीला शोध उमेदवाराचाराष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या या मतदारसंघातील अनेक मंडळी सद्य:स्थितीत महाआघाडीत दाखल झाली आहेत. यामुळे यावेळी राष्ट्रवादीला सक्षम उमेदवाराचा शोध करावा लागत आहे. सुनीता रेडेकर व हिरा केसरकर या महाआघाडीतून इच्छुक आहेत.‘कमळ’ रुजलं;पण फुलण्याची शक्यता नाहीभाजपने या मतदारसंघात गेल्या सहा महिन्यांत अनेक गावांत शाखा उघडून तरुणांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. तरुणाईच्या आकर्षणामुळे भाजपचे कमळ गावागावांत रुजले आहे; परंतु मातब्बर उमेदवारांमुळे ते यावेळी फुलण्याची शक्यता दिसत नाही.