शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना आदरांजली!!

By admin | Updated: January 4, 2016 03:30 IST

देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना रविवारी अकाली दल नेत्यांच्या उपस्थितीत शहीद ठरवून आदरांजली वाहण्यात आली. एवढेच नाहीतर, त्यांच्या कुटुंबीयांचाही येथे आयोजित एका

नवी दिल्ली : देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना रविवारी अकाली दल नेत्यांच्या उपस्थितीत शहीद ठरवून आदरांजली वाहण्यात आली. एवढेच नाहीतर, त्यांच्या कुटुंबीयांचाही येथे आयोजित एका समारंभात सत्कार करण्यात आला. हिंदू महासभा नथुराम गोडसेची जयंती साजरी करूशकते मग शीख समुदाय या तिघांची पुण्यतिथी का साजरी करू शकत नाही, असा युक्तिवादही अकाली दलाने आपल्या कृतीच्या समर्थनार्थ केला. मोतीबाग गुरुद्वारात शीख स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित समारंभात इंदिरा गांधी यांचमारेकरी केहरसिंग, सतवंतसिंग आणि बेअंतसिंग यांच्या स्मरणात ‘भोग’ आणि अखंड पाठ आयोजित करण्यात आला होता. यावेळी या मारेकऱ्यांना शीख पंथाचे शहीद असे संबोधण्यात आले. तसेच गुरुद्वाराच्या प्रमुख ग्रंथींनी केहरसिंगच्या विधवेचा ‘सिरोपा’ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाला दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे माजी प्रमुख अवतारसिंग हित, धर्म प्रचार समितीचे अध्यक्ष परमजीतसिंग आणि शीख विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गुरमीतसिंग उपस्थित होते. शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था अकाल तख्तने बेअंतसिंग,सतवंतसिंग आणि केहरसिंग या तिघांना यापूर्वीच शहीद घोषित केले असून आम्ही केवळ त्यांची पुण्यतिथी साजरी करीत आहोत,असे गुरमीतसिंग यांनी सांगितले. ते गुन्हेगार अथवा दहशतवादी नाहीत. धार्मिक प्रथेनुसार आपले अंत्यसंस्कार व्हावेत हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार आहे. न्यायालयाने त्यांना भलेही मृत्युदंड दिला असेल परंतु शीख समुदाय १९८४ च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असे मनजीतसिंग जीके यांनी या समारंभाबाबत विचारणा केली असताना स्पष्ट केले. दिल्ली शीख गुरुद्वारा समितीने या कार्यक्रमाचे समर्थन केले असले तरी जीके तेथे उपस्थित नव्हते. पंजाबमध्ये भाजपासोबतच्या सत्ताधारी आघाडीत शिरोमणी अकाली दल सहभागी असून राज्यात २०१७ साली तेथे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचा सन्मान करण्यावर भाजपाने यापूर्वीच आक्षेप घेतला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)