शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा वृद्धिदर घसरणार; नाणेनिधीने वर्तविला अंदाज

By admin | Updated: January 18, 2017 01:09 IST

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा जीडीपी वृद्धीचा चालू आर्थिक वर्षाचा अंदाज घटवून ६.६ टक्के केला आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा जीडीपी वृद्धीचा चालू आर्थिक वर्षाचा अंदाज घटवून ६.६ टक्के केला आहे. आधी हा अंदाज ७.६ टक्के होता. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसल्याने भारताचा वृद्धिदर खाली येणार असल्याचे नाणेनिधीने म्हटले. नाणेनिधीने २0१६-१७ या वर्षासाठी चीनचा जीडीपी वृद्धीचा अंदाज मात्र वाढवून ६.७ टक्के केला आहे. आधी तो ६.५ टक्के दर्शविलेला होता. नोटाबंदीचा प्रभाव संपल्यानंतर २0१७-१८ मध्ये अर्थव्यवस्था सुरळीत होऊन भारताचा वृद्धिदर ७.२ टक्के होईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे. आधीच्या ७.६ टक्के या अंदाजापेक्षा हा दर अर्थातच कमी आहे. २0१८-१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर ७.७ टक्क्यांवर जाईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात आजपर्यंत नाणेनिधीने जागतिक नरमाईच्या पार्श्वभूमीवर भारताला चमकता तारा म्हटले होते. तथापि, जानेवारीतील अंदाजात नाणेनिधीने भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आर्थिक व्यवहारच ठप्प झाले होते !जागतिक अर्थव्यवस्था दृष्टिक्षेप सुधारणा अहवाल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी जारी केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अनेक देशांसाठी नाणेनिधीने कॅलेंडर वर्षासाठी अंदाज दिला आहे. भारतासाठी मात्र, आर्थिक वर्षासाठी देण्यात आला आहे. नाणेनिधीने म्हटले की, चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २0१६-१७ साठी, तसेच त्यापुढील वर्षासाठी भारताचा वृद्धिदर अनुक्रमे १ टक्का आणि 0.४ टक्का कमी करण्यात आला आहे.नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. नोटाबंदीमुळे रोख रकमेची टंचाई निर्माण झाली. पेमेंट व्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. >संयुक्त राष्ट्राला आशाभारताचा विकासदर ७.७ टक्के राहील, असा अंदाज वर्तवत संयुक्त राष्ट्राच्या अहवालात भारताकडून वृद्धीच्या आशा असल्याचे स्पष्ट करण्यता आले आहे. भारत यंदा सर्वांत वेगाने प्रगती करणारा विकसनशील देश असेल असेही, अहवालात म्हटले आहे.>नाणेनिधीचा अंदाज खरा ठरल्यास जगात सर्वाधिक वेगाने वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा किताब भारताला गमवावा लागणार आहे.