शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे चोख प्रत्युत्तर : पाकिस्तानचे दोन सैनिक ठार, 14 चौक्या उद्ध्वस्त

By admin | Updated: November 1, 2016 18:58 IST

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मंगळवारी सात नागरिक ठार झाल्याने संतप्त झालेल्या भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानला त्याच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. 1 - पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मंगळवारी सात नागरिक ठार झाल्याने संतप्त झालेल्या भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानला त्याच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले असून, त्यांच्या 14 चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. 
जम्मूमधील अरनिया आणि रामगड विभागात केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानी रेंजर्सच्या 14 चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती बीएसएफने दिली आहे. तत्पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सात नागरिकांना मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये दोन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे. अरनियामधील गोळीबारात तीन भारतीय नागरिक जखमी झाले होते. 
 पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर येथील रामगड येथील नागरिकांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत असल्याची माहिती एका अधिका-याने दिली आहे.   
मंगळवारी पहाटे 5 पासून पाकिस्तानने पुन्हा गोळीबार सुरू केला.त्यात  काश्मीरमधील आर.एस. पुरा जिल्ह्यातील अरनिया सेक्टरमधील गोळीबारात 2 नागरिक जखमी झाले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून आतापर्यंत 60 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय जवान पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.