शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेकडे वाढला भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ

By admin | Updated: November 17, 2015 02:35 IST

रुपयाच्या तुलनेत डॉलर कितीही महाग होत असला आणि आपल्या देशात शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती होत असली तरी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

- पवन देशपांडे,  मुंबई रुपयाच्या तुलनेत डॉलर कितीही महाग होत असला आणि आपल्या देशात शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती होत असली तरी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चीनलाही मागे सोडत भारतीय विद्यार्थीसंख्येत या वर्षी २९ टक्के वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मैत्रीनंतर हा विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडे ओघ वाढल्याचे दिसून आले आहे. इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल एज्युकेशन या संस्थेने अमेरिकेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक खात्याच्या साहाय्याने तयार केलेला ‘ओपन डोअर्स’ अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या व त्यांचा कल यामध्ये दिलेला असून, त्यानुसार अमेरिकेत येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या गेल्या ३५ वर्षांमध्ये प्रथमच १० टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २९ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत चीन आघाडीवर असला तरी या वर्षी चीनच्या विद्यार्थ्यांची संख्या फारशी वाढलेली दिसून आलेली नाही. ३ लाखांवर चिनी विद्यार्थ्यांनी या वर्षी अमेरिकेत प्रवेश घेतला आहे. अमेरिकन विद्यापीठाची पदवी घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९ टक्के वाढ झाली आहे. मात्र छोटेमोठे कोर्स करून परत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय विद्यार्थी अमेरिकेत काय निवडतात?इतर14.4%सामाजिक शास्त्र2.4%गणित/कॉम्प्युटर31.4%इंजिनीअरिंग37.5%व्यावसायिक10.7%आरोग्यसेवा3.6%कोणत्या अभ्यासक्रमासाठी अमेरिकेला अधिक पसंती?22%इतर कोर्स12%पदवीपूर्व शिक्षण64%पदवी02%छोटे-मोठे कोर्स