शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’चे भारतीय हस्तक ‘लो प्रोफाईल’

By admin | Updated: April 22, 2016 03:09 IST

इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने भारतातील आपल्या हस्तकांना काही काळ ‘लो प्रोफाईल’ राहण्याचा सल्ला दिला आहे

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने भारतातील आपल्या हस्तकांना काही काळ ‘लो प्रोफाईल’ राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या जानेवारीत राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबईत राहणारा इंजिनिअर मुदब्बिर मुश्ताक शेख याच्या नेतृत्वात चालविण्यात येणाऱ्या इसिस प्रभावित गटांच्या कारवाया चिरडून काढण्यासाठी देशाच्या अनेक भागात व्यापक धरपकड मोहीम राबविली होती. एनआयएच्या सक्रियतेमुळे इसिसचे म्होरके धास्तावले असून त्यांनी भारतातील आपल्या हस्तकांना सतर्क राहण्यासोबतच काही काळ शांत राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसमध्ये दहशतवाद्यांची भरती करणारा शफी अरमर ऊर्फ युसूफ अल हिंदी याने भारतातील त्याच्या साथीदारांना इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमाने संपर्कात राहणाऱ्यांसोबत सक्रियता कमी करण्यास सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)इसिसमध्ये सामील होण्यासाठी इराक आणि सिरियाला जाणाऱ्या तरुणांचा शोध व त्यांच्यात कट्टरवादाचे बीज पेरण्यासाठी या संघटनेचे म्होरके इंटरनेट आणि सोशल मीडियाचाच मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नाहीतर भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यासाठीही दहशतवादी इंटरनेटचा वापर करतात. हे लक्षात आल्यानंतर एनआयएने गेल्या काही महिन्यांपासून इंटरनेट व सोशल मीडियावर कडक पाळत ठेवली आहे. विदेशातील इसिसचे म्होरके आणि भारतीय तरुणांमधील आॅनलाईन संपर्क कमी झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, असे गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.