शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सुटाबुटात भारतीय नेते वेटरसारखे दिसतात : स्वामी

By admin | Updated: June 25, 2016 03:12 IST

घुराम राजन, अरविंद सुब्रमणियन आणि केंद्रीय वित्त सचिव शक्तिकांत दास यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आता थेट अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शाब्दिक वार सुरू केले

नवी दिल्ली : रघुराम राजन, अरविंद सुब्रमणियन आणि केंद्रीय वित्त सचिव शक्तिकांत दास यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आता थेट अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शाब्दिक वार सुरू केले असून, भाजपा नेत्यांनी व मंत्र्यांनी विदेशात जाताना भारतीय पेहरावात जावे, टाय व सूट घातलेल्या अवस्थेत ते वेटरसारखे दिसतात, अशी ट्विप्पणी केली आहे.भाजपाचे नेते असलेले सुब्रमण्यम स्वामी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा वगळता कोणालाच जुमानत नसून, त्यामुळेच त्यांनी उघडपणे जेटली यांना लक्ष्य केले आहे. नेत्यांनी तोंडाला आवर घालावा आणि शिस्त पाळावी ,असा सूचक इशारा जेटली यांनी स्वामी यांना दिला होता. यावर नाव न घेता, मी तोंड बंद ठेवले, तर अनर्थ ओढवेल, अशी तिखट प्रतिक्रिया स्वामी यांनी व्यक्त केली आहे. अरुण जेटली गुरुवारी बँक आॅफ चायनाचे अध्यक्ष तिआन गिली यांना बीजिंगमध्ये भेटले. त्यांचे सूट व टायमधील छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच, स्वामींनी भाजपाच्या नेत्यांनी व केंद्रीय मंत्र्यांनी विदेशात भारतीय पद्धतीचे कपडे घालावेत असे ट्विट केले आणि तेवढ्यावर न थांबता सूट व टायमध्ये भारतीय नेते वेटर वाटतात असेही म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)