शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाळवंटात भारतीय जवानांना मिळणार आता ‘एसी जॅकेट’

By admin | Updated: April 25, 2015 01:32 IST

वाळवंटात कमालीच्या उष्णतेत काम करणाऱ्या भारतीय जवानांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटना डीआरडीओने वातानुकूलित अंतर्वस्त्रे व जाकिटे तयार केली

नवी दिल्ली : वाळवंटात कमालीच्या उष्णतेत काम करणाऱ्या भारतीय जवानांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटना डीआरडीओने वातानुकूलित अंतर्वस्त्रे व जाकिटे तयार केली असून, प्रयोगशाळेत त्यांची चाचणीही पूर्ण झाली आहे. शरीरावर धारण करता येणारी व कोठेही घेऊन जाता येणारी ही वातानुकूलित यंत्रणा वाळवंटात वापरण्यासाठी असून डीआरडीओच्या प्रयोगशाळाचे हे संशोधन आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले. या अंतर्वस्त्राच्या साहाय्याने असह्य अशा उष्णतेचा त्रास बराच कमी होणार आहे. या शीत जॅकिटामुळे उष्णता १० ते १५ अंश सेल्सिअस इतकी कमी होऊ शकते. अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानात तैनात करण्यात आलेल्या जवानांसाठी अशी शीत अंतर्वस्त्रे वापरली होती; पण भारतीय जवानांसाठी प्रथमच देशी बनावटीची ही शीत जॅकिटे तयार करण्यात आली असून, ती सैनिक व निमलष्करी जवान दोघांनाही वापरता येणार आहेत. डीआयपीएसच्या हिट फिजिआॅलॉजी (शरीरशास्त्र) गटाने ही जॅकिटे तयार केली आहेत. ही अंतर्वस्त्रे व जाकिटे पेल्टिअर परिणामाच्या तत्त्वावर काम करतात. त्याअंतर्गत इलेक्ट्रिक सर्किटच्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह टर्मिनलचे तापमान वेगवेगळे असते. निगेटिव्ह बाजू थंड असेल तर तिच्या संपर्कात येणारी वस्तूही थंड होते. हे तंत्र वापरून जॅकिटातील पोकळ नळ्यांत निगेटिव्ह बाजूने हवा भरली जाते. त्यामुळे आतील हवाही थंड होते. काळ्या रंगाच्या या सच्छिद्र जॅकिटातील नळ्या त्वचेला थंड करतात.