शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

चीनची हायस्पीड ट्रेन कंपनी बनवणार भारतीय रेल्वेची इंजिने

By admin | Updated: August 22, 2016 05:11 IST

भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात लवकरच एक महत्वाची घटना घडणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात लवकरच एक महत्वाची घटना घडणार आहे. चीनची सर्वात मोठी हायस्पीड ट्रेन कंपनी रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन (सीआरआरसी) भारतात उभय देशांच्या संयुक्त प्रकल्पाच्या स्वरूपात हरयाणात रेल्वे इंजिने बनवण्याचा आणि दुरूस्त करणारा कारखाना सुरू करणार आहे. या कारखान्यामुळे भारतीय रेल्वे इंजिनांचे बाह्य स्वरूपही बदललेले दिसेल.‘मेक इन इंडिया’ या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी घोषवाक्याला अनुसरून सीआरआरसी पायोनियर इंडिया इलेक्ट्रिक कंपनी लि. या नावाने सुरू होणारा ६ कोटी ३४ लाख डॉलर्स (४२५ कोटी रूपयांचा) हा संयुक्त प्रकल्प, भारतीय रेल्वेच्या इतिहासात चीनची पहिली मोठी गुंतवणूक आहे. उभय देशांच्या या संयुक्त कंपनीत चीनचा भांडवली सहभाग ५१ टक्के आहे.सीएनआर कॉर्प व चायना सीएसआर च्या विलिनिकरणातून सीआरआरसी कंपनी अस्तित्वात आली. चीनची ही कंपनी जगातल्या १0१ देशांना रेल्वेसाठी सध्या आवश्यक उपकरणे पुरवते. २0१५ साली उत्तर अमेरिकेतील मेसाच्युएटस येथे सीआरआरने कारखाना उभारला. भारतीय बाजारपेठेत सीआरआरसी २00७ पासून कार्यरत आहे. सब वे ट्रेन्स, लोकोमाटिव्ह इंजिने, रेल्वे व्हेईकल्स व त्यांचे सुटे भाग या कंपनीतर्फे भारताला पुरवले जातात. भारतातल्या अनेक रेल्वे इंजिनिअर्सचे प्रशिक्षणही चीनमधे झाले आहे. भारतात रेल्वेचे विशाल नेटवर्क लक्षात घेता केवळ हरयाणात होऊ घातलेल्या एकाच प्रकल्पात भागीदारी करून ही कंपनी थांबू इच्छित नाही, तर ट्रेनचे इंजिन, लोकोमोटिव्ह ट्रॅक्शन सिस्टीम तयार करणारे अनेक कारखाने देशात उभारण्याबरोबर भारताची विविध क्षेत्रातली पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेउन भूगर्भातून तेल काढणे, पवनचक्क्यांची निर्मिती व उभारणी करणे, खाणकामासाठी उपयुक्त उपकरणांचे भारतात उत्पादन करणे, आदी क्षेत्रातही काम करण्याची तयारी कंपनीने चालवली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>भारतात रेल्वे विद्यापीठ उभारण्यालाही मदतभारतीय रेल्वे हे ६४ हजार किलोमीटर्स अंतराचे जगातले सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. या महाकाय रेल्वे नेटवर्कसाठी उभय देशांच्या संयुक्त प्रकल्पाव्दारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्यासह इलेक्ट्रिक ट्रान्समिशनमधे मदत करण्याचा सीआरआरसी कंपनीचा मनोदय आहे. भारतात रेल्वे विद्यापीठ उभारण्याच्या संकल्पनेलाही चीनने या कंपनीव्दारे मदतीचा हात पुढे केला आहे.