शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कंदील बलोचला हवं होतं भारतीय नागरिकत्व

By admin | Updated: July 18, 2016 11:16 IST

पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 18 -  पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं. कंदील बलोचने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानाकडून माझी निराशा झाली असून भारतीय नागरिकत्व हवं असल्याचं म्हटलं होतं. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करण्यात आलं होतं. अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मिळाल्यापासून अनेक पाकिस्तानी कलाकरांनी भारतात स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 
 
कोलकात्यातील ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा करणारी  पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोच हिची मुलतान येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कंदील हिच्या भावानेच ही हत्या केली आहे. पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली आहे. 
(पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या)
 
हत्या होण्याच्या आधी काही दिवसांपुर्वी कंदील बलोचने मुलाखत दिली होती. 'पाकिस्तानातील लोक मला स्विकारण्यास तयार नाहीत. भारतात काम करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे', असं म्हटलं होतं. कंदील बलोचला तिच्या बोल्ट फोटो, व्हिडिओजमुळे कुटुंबाकडून धमक्या मिळत होत्या. आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणीही तिने सुरक्षा यंत्रणांकडे केली होती. 
 
कंदीलचा छोटा भाऊ वसीमला डेरा गाजी खान येथून अटक करण्यात आली होती. बहिणीला अंमली द्रव्य देऊन नंतर तिची गळा आवळून हत्या केली असल्याचं त्याने मान्य केलं आहे. सोशल मीडियावर आपत्तीजनक व्हिडिओ आणि वक्तव्य प्रसिद्ध करुन तिनं बलौच कुटुंबाचं नाव धुळीला मिळवलं होतं, त्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली वसीमने दिल्याची माहिती ‘द डॉन’ने दिली होती.
 
पाकिस्तानमधील प्रसिद्ध मॉडेल असलेली कंदील ही तिचे फोटो व खळबळजनक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असायची. काही महिन्यांपूर्वीच तिने विराट कोहलीबद्दल प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तर त्यापूर्वी तिने पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकल्यास स्ट्रीप डान्स करण्याची खळबळजनक घोषणा केली होती.