वॉशिंग्टन : भारत आज विकासाच्या आलेखात प्रमुख व आघाडीच्या अर्थव्यवस्थांचे नेतृत्व करीत असल्यामुळे तो चीनला विकासदरात अधिकृतपणे मागे सारेल, असे जागतिक बँकेचे म्हणणे आहे.बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा अपेक्षित विकासदर यावर्षी ७.५ टक्के असेल. जागतिक बँकेकडील आघाडीच्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारत वरच्या जागी आहे, असे बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू यांनी म्हटले. जागतिक आर्थिक स्थितीवरील ताजी आकडेवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. तीत चीनचा विकास दर ७.१ टक्के असण्याचा अंदाज आहे. यावर्षी विकसनशील देशांचा विकास दर ४.४ टक्के असण्याचा अंदाज आहे. हा दर २०१६ मध्ये ५.२ आणि २०१७ मध्ये ५.४ टक्के असण्याचे भाकीत आहे. चीन अर्थव्यवस्थेच्या कमी झालेल्या गतीला खूप काळजीपूर्वक हाताळत आहे. यावर्षी त्याचा विकासदर ७.१ टक्के एवढा चांगला असण्याची शक्यता आहे. भारत हा मोठा तेल आयातदार देश आहे. भारताने केलेल्या आर्थिक सुधारणा आणि तेलाच्या घटलेल्या किमतीमुळे अर्थव्यवस्थेतआत्मविश्वास निर्माण झाला असल्यामुळेच यावर्षी त्याची अर्थव्यवस्था उत्तम म्हणता येईल अशी ७.५ टक्के वाढीची असेल. जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू परंतु खात्रीने दिशा बदलत आहे. चीनने अर्थव्यवस्थेतील दोष टाळले असून आता त्याचा विकास दर ७.१ टक्के असण्याचा अंदाज आहे. भ्रष्टाचारामुळे बातम्यांमध्ये आलेला ब्राझील तेवढा नशीबवान नाही त्याचा विकासदर नकारात्मक आहे, असे बसू यांनी सांगितले.दक्षिण आशियात यावर्षी विकासाचा दर सातत्याने ७.१ असेल असे अपेक्षित आहे.
उगवत्या अर्थव्यवस्थांत भारत अव्वल
By admin | Updated: June 12, 2015 00:21 IST