शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारताने फेटाळला अमेरिकेचा भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव

By admin | Updated: April 4, 2017 22:33 IST

भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणावाचे वातावरण निवळण्यासाठी अमेरिकेने दिलेला मध्यस्थीचा प्रस्ताव

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ४ - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणावाचे वातावरण निवळण्यासाठी अमेरिकेने दिलेला मध्यस्थीचा प्रस्ताव भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे. दहशतवादी कारवाया, सर्जिकल स्ट्राइक, नियंत्रण रेषेवरील गोळीबार यामुळे गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सातत्याने तणावपूर्ण वातावरण आहे.  हे वातावरण निवळण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या प्रस्ताव अमेरिकेने दिला होता. स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रक्रिया सुरू होण्यासाठी मध्यस्थी करण्यात उत्सुकता दाखवली होती. 
 पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच्या भारताच्या भूमिकेत कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. पाकिस्तानसोबतची विविध मुद्यांवरील द्विपक्षीय चर्चा दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणात व्हावी अशी भारताची भूमिका आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप न करण्याची भूमिका अमेरिकेने घेतली होती. आता मात्र त्यात बदल होत असल्याचे अमेरिकेच्या या कृतीमधून दिसत आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी निकी हेली यांनी सांगितले की, अमेरिका भार आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे चिंतीत आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प दोन्ही देशांमध्ये शांतता प्रक्रियेत सहभागी होऊन हा प्रश्न सोडवण्यास इच्छुक आहेत,  
भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्नामध्ये तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला भारताने नेहमीच विरोध केला आहे. तसेच अमेरिका आणि रशियासह जगातील बहुतांश देशांनी भारताची ही भूमिका मान्य केली आहे.