शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आळशी लोकांच्या यादीत भारत ३९वा!

By admin | Updated: July 15, 2017 00:22 IST

जगातील ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या आळशी लोकांच्या यादीत भारत ३९ व्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या आळशी लोकांच्या यादीत भारत ३९ व्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. भारतीय लोक दिवसाला जास्तीत जास्त ४२९७ पावले चालतात, असे या सर्व्हेतून आढळून आले आहे. स्टॅटफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा सर्व्हे केला असून, त्यात जगतील ४६ देशांमधील तब्बल लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. सर्व्हेत सहभागी झालेले रोज किती चालतात, याची नोंद ठेवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्टेप काउंटर्स अ‍ॅप इन्स्टॉल करण्यात आले होते. सर्व्हेच्या निष्कर्षानुसार चीनमधील नागरिक सर्वात कमी आळशी आहेत. त्यातही हाँगकाँगमधील लोक अधिक उत्साही असून, ते दिवसाला किमान ६८८0 पावले चालतात.इंडोनेशिया हा देश मात्र सर्वात आळशी देश ठरला आहे. दिवसाला किमान ३,५१३ पावले चालणे आवश्यक मानले जाते. मात्र, इंडोनेशियातील लोक त्याच्या निम्मीही पावले चालत नाहीत, असे हा सर्व्हे सांगतो.जगभरातील सरासरी आकडा ४,९६१ पावलं आहे. अमेरिकन लोक दिवसाला ४,७७४ पावले चालतात. हाँगकाँग, चीन, युक्रेन आणि जपान यांनी यादीत वरील स्थान पटकावले असून या देशांमधील नागरिक दिवसाला किमान सहा हजार पावलं चालतात. मलेशिया, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया यादीमध्ये सर्वात खाली असून येथील नागरिक दिवसाला जेमतेम ३९00 पावलेच चालतात. सर्व्हेतील मिळालेल्या माहितीनुसार पुरुषांच्या तुलनेत भारतीय कमी चालतात. भारतीय महिला दिवसाला किमान ३,६८४ तर पुरुष ४,६0८ पावले चालतात, असे हा सर्व्हे सांगतो. अधिकाधिक चालल्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण कमी होते. मात्र महिलांनी आपले चालणे बंद वा कमी केल्यास चालणं बंद केल्यास त्यांचा लठ्ठपणा अतिवेगाने वाढतो. महिलांच्या बाबतीत हे प्रमाण २३२ टक्के, तर पुरुषांच्या बाबतीत ६७ टक्के आहे.