शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार, NSG साठीही पाठिंबा

By admin | Updated: November 11, 2016 20:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या उपस्थितीत नागरी अणू करारावर स्वाक्ष-या झाल्या.

ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. 11- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौ-यात मोठं यश मिळालं आहे. भारत आणि जपान दरम्यान ऐतिहासिक अणू करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या उपस्थितीत नागरी अणू करारावर स्वाक्ष-या झाल्या. भारतासोबत अणूकरार करणारा जपान हा 11 वा देश आहे. 
तसेच, जपानने अणू पुरवठादार गटात(NSG) भारताच्या कायम सदस्यत्वाचंही समर्थन केलं आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.  अणुपुरवठादार देशांच्या समूहाची आज व्हिएन्नामध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामध्ये भारताच्या समावेशाबाबतचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत आणि जपान हे नैसर्गिक मित्र आहेत,  भारत -जपानच्या भागीदारीमुळे समाजात शांतता आणि समतोल राखण्यास मदत होईल असं मोदी म्हणाले. भारत आणि जपान दोघं मिळून दहशतवादाविरोधात लढण्यास तयार आहे असंही मोदी म्हणाले.    
यापुर्वी गुरूवारी मोदींनी एका व्यापार सभेत  'मेक इन इंडिया, मेड बाय जापान' असा नारा दिला होता.