शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारताने उरी हल्ल्याचे पुरावे दिले पाकिस्तानकडे, कारवाई करण्याची केली मागणी

By admin | Updated: September 27, 2016 20:56 IST

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २७ - काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या उरी सेक्टरमध्ये सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाचे १९ जवान शहीद झाले. हा हल्ला पाकिस्ताननेच केला असल्याचे पुरावे आज भारताने पाकिस्तानकडे सुपूर्त केले आहेत. या हल्ल्यामुळे देशभर दु:खाची छाया आणि आक्रोशाचे वातावरण आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २२ सप्टेंबररोजी जयशंकर यांनी बासीत यांना समन्स बजावत दहशतवाद्यांकडे आढळलेल्या जीपीएस प्रणाली, कपडे, शस्त्रास्त्र यांची माहिती दिली होती. भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी अब्दुल बासीत यांना उरी हल्ल्यातील काही पुरावेदेखील देण्यात आले असून या पुराव्यांमधून दहशतवादी हे पाकिस्तानमधूनच आल्याचे स्पष्ट होते. या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा मार्ग दाखवणा-या दोघा जणांची नावही पाकिस्तानला देण्यात आली आहेत.दहशतवाद्यांना मार्ग दाखवणा-या दोन तरुणांची नाव पाकिस्तानला देण्यात आली. फैझल हुसैन (२०) आणि यासीन खुर्शीद (१९) अशी या दोघांची नाव आहेत. तसेच उरीत हल्ला करणा-या एका दहशतावाद्याची ओळख पटली असून हाफीज अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तोदेखील पाकव्याप्त काश्मीर निवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही सर्व माहिती बासीत यांना देण्यात आली आहे.

दरम्यान, उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे. काश्मिरमधल्या मुस्लीमांच्या लढ्याला शीखांनी पाठिंबा देऊ नये म्हणून शीखांचं प्राबल्य असलेल्या उरीची खोट्या दहशतवादी हल्ल्यासाठी निवड करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.