शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा नाही

By admin | Updated: August 25, 2014 09:52 IST

भारत - पाक सीमारेषेवर दररोज शस्त्रसंधींचे उल्लंघन होत असतानाच युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यास भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा नाही अशी माहिती समोर येत आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २५ - भारत - पाक सीमारेषेवर दररोज शस्त्रसंधींचे उल्लंघन होत असतानाच युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यास भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. टँक, एअर डिफेंन्स, अँटी टँक गाइडेड मिसाईल्स, स्पेशलाईज्ड मशीन गन मॅगझिन्स,ग्रेनेड्स अशा प्रमुख शस्त्रांचा भारताकडे तुटवडा असून यातील काही युद्धसामग्री आठवडाभरातच संपेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. 
भारताकडे उपलब्ध असलेला शस्त्रसाठा ब-याच वर्षांपासून वापरण्यात आलेला नाही तसेच देशभरातील ३९ ऑर्डीनन्स फॅक्टरीत संथगतीने होणा-या उत्पादनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते.  साधारणतः सैन्याकडे घनघोर युद्धात ३० दिवस पुरेल आणि सामान्य युद्धात ३० दिवस पुरे ऐवढा शस्त्रसाठा आणि दारुगोळा असणे अपेक्षीत असते. तीन दिवस चालणारे सामान्य युद्ध हे एक दिवस चालणा-या घनघोर युद्धाच्या बरोबरीत समजले जाते. यानुसार सैन्याकडे घनघोर युद्धात ४० दिवस पुरेल ऐवढा शस्त्रसाठा असणे अपेक्षीत असते.मात्र भारतीय सैन्याकडे २० दिवस पुरेल ऐवढाच दारुगोळा उपलब्ध आहे. मोदी सरकारला वस्तूस्थितीची पूर्णतः जाणीव असून यावर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे संरक्षण मंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले. भारताकडे आवश्यक शस्त्रसाठा आणि दारुगोळा असावा यासाठी सुमारे ९७ हजार कोटी रुपये लागणार असून २०१९ पर्यंत भारताची स्थिती सुधारेल असेही अधिका-यांनी स्पष्ट केले. कारगिल युद्धादरम्यानही भारताकडे पुरेसा दारुगोळा नसल्याने इस्त्रायलकडून दारुगोळा घेण्याची नामूष्की सरकारवर ओढावली होती. मात्र यातून अद्याप बोध घेतलेला नाही असेच दिसत आहे.