शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भारत, चीन युद्धसराव सुरू

By admin | Updated: October 12, 2015 22:44 IST

भारतीय व चिनी लष्कराच्या दहशतवाद प्रतिबंधक संयुक्त युद्ध सरावास चीनच्या युनान प्रांतात प्रारंभ झाला. हा दहादिवसीय सराव परस्पर ताळमेळ, संपर्क आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यास उपयोगी ठरेल

बीजिंग : भारतीय व चिनी लष्कराच्या दहशतवाद प्रतिबंधक संयुक्त युद्ध सरावास चीनच्या युनान प्रांतात प्रारंभ झाला. हा दहादिवसीय सराव परस्पर ताळमेळ, संपर्क आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यास उपयोगी ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताने या युद्ध सरावात भाग घेण्यासाठी प्रथमच ईस्टर्न कमांडच्या नागा रेजिमेंटच्या १७५ जवानांचे एक पथक पाठविले आहे. हे पथकच चीनलगतच्या सीमेची निगराणी करते. चीनच्या चेंगदू लष्करी विभागाच्या १४ कोरचे जवान या सरावात भाग घेत असून त्यांच्याकडेही भारतालगतच्या सीमावर्ती भागांवर निगराणी ठेवण्याची जबाबदारी आहे. भारतीय दूतावासाने सोमवारी येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, दोन्ही देशांनी संयुक्त युद्ध सरावासाठी समप्रमाणात सैनिक पाठवले असून हा सराव २२ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. दोन्ही देशांचे जवान कसून युद्ध सराव करतील. चेंगदू लष्करी विभागाचे उपकमांडर लेफ्टनंट जनरल झोऊ शियाओझोऊ यांनी उद्घाटन सोहळ्यात दहशतवादाविरुद्ध युद्ध सराव करीत असलेल्या जवानांना संबोधित केले. ते म्हणाले की, भारत आणि चीनदरम्यानचे उच्चस्तरीय दौरे व विशेष करून चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी केलेला भारताचा दौरा व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या चीनच्या दौऱ्याने द्विपत्रीय संबंधांना चालना मिळाली आहे.