शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

देशांतर्गत विमान वाहतुकीत भारत पुढेच

By admin | Updated: March 9, 2017 00:26 IST

भारताचे देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्र सलग २२ व्या महिन्यात जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाने (आयएटीए) ही माहिती दिली.

नवी दिल्ली : भारताचे देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्र सलग २२ व्या महिन्यात जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाने (आयएटीए) ही माहिती दिली.‘आयएटीए’ने म्हटले की, भारतीय देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्र सलग २२ महिन्यात जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थानी आहे. जानेवारीत भारताने २६.६ टक्के वृद्धीदर मिळविला. हा वृद्धीदर सलग १५ व्या महिन्यात २0 टक्क्यांपेक्षा जास्त ठरला. विमानांची उड्डाणे वाढल्यामुळे मागणीही वाढली आहे. जागतिक पातळीवर देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रातील वाढीचा दर जानेवारीत ९९.९ टक्के राहिला. ब्राझिल वगळता जगातील सर्वच देशांत वृद्धी दिसून आली. चीन, भारत आणि रशिया या देशांतील वृद्धीदर दोन अंकी राहिल्यामुळे जागतिक पातळीवरील वृद्धीला बळ मिळाले. चीनचा वृद्धीदर २३.२ टक्के राहिला. ‘आयएटीए’प्रमाणेच भारतीय विमान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेही (डीजीसीए) या क्षेत्रातील भारताच्या वृद्धीदराचे कौतुकास्पद आकडे जाहीर केले आहे. डीजीसीएने जारी केलेल्या माहितीनुसार, २0१६ मध्ये ९.९ कोटी भारतीयांनी विमान प्रवास केला. आदल्या वर्षी हा आकडा ८.१ कोटी होता. याचाच अर्थ २0१६ मध्ये २३.२ टक्के वृद्धी नोंदली गेली.