शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

पिंपळगावला वाढत्या झोपडपट्या बनली डोकेदुखी

By admin | Updated: June 3, 2014 01:42 IST

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत शहराचे नाव आशिया खंडात सर्वांत मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक आहे. ५० हजारांच्या पुढे येथे लोकसंख्या असून, दोन किलोमीटरचा परिसरात शहर वसलेले आहे. शहरात सध्या दिवसागणिक मोकळ्या जागेवर झोपड्यांची संख्या वाढल्या आहे. काही दिवसातच कायदा सुखवण्याच्या दृष्टीने या झोपड्या सर्वसामान्यांना डोकेदुखी ठरणार आहे.

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत शहराचे नाव आशिया खंडात सर्वांत मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक आहे. ५० हजारांच्या पुढे येथे लोकसंख्या असून, दोन किलोमीटरचा परिसरात शहर वसलेले आहे. शहरात सध्या दिवसागणिक मोकळ्या जागेवर झोपड्यांची संख्या वाढल्या आहे. काही दिवसातच कायदा सुखवण्याच्या दृष्टीने या झोपड्या सर्वसामान्यांना डोकेदुखी ठरणार आहे. पिंपळगाव ग्रामपालीकेला चार वर्षापूर्वी तहसिलदार जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावून झोपडपट्या उठवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व झोपडप˜ी रहिवाशी यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयानेही या विरोधात निकाल देऊन दंडात्मक कार्यवाहीचे आदेश दिले. चार वर्षात पिंपळगावात अनेक ठिकाणांवर झोपडपट्यांची संख्या वाढली गेली. यात स्थानिक प्रसारकही सहभागी असल्याचे नाकारता येत नाही. झोपडप˜ी उंबरखेडरोड यशवंत नगरचा मोकळा भुखंड या नगराचा पाच ??? भुखंड येथील सोसायटीने १९८४ साली ग्रामपालीकेकडे वर्ग केला. ग्रामपालिकेने १० वर्षापूर्वीच या ठिकाणावर नियोजित तरण तलाव बांधण्याचे आश्वासन दिले होते. निधी अभावी हे कामाला सुरुवात होऊ शकली नाही. मात्र याच जागेचा फायदा झोपडपट्यांमध्ये राहणारे नागरिकांनी घेऊन नव्याने झोपड्या बांधण्यास सुरुवात झाली. याठिकाणी शेकडो झोपड्या उभारल्या अन्य ठिकाणी चांगली घर खरेदी केली त्यांनी या ठिकाणच्या झोपड्या ज्या व्यक्तींनी दिल्या आहेत. यशवंत नगरच्या भुखंडावर तर काही व्यक्तींनी झोपड्या बांधुन विक्री करण्याचा गोरख धंदा सुरु केला आहे. प्रशासनाने एक वर्षापासून नव्याने झोपड्यांवरजरी बंदी घातली असली तरी पण याठिकाणी कमी कालावधीत उभे राहणार्‍या झोपड्यांना वीजपुरवठा देखील पुरविण्यात आली आहे. पाच ??? जागेवर तर या तलावाच्या जागेवर झोपड्याचा तलाव मात्र जरूर बघावयास मिळतो येथे राहणारे नागरीक शौचालयासाठी उघड्यावर बसत असल्याने परिसरातील मोठी दुर्गंधी पसरली आहे. निफाडरोड वरील विटभ˜ी झोपडप˜ी :- पिंपळगाव बसवंत येथील बरीच जुनी असले त्या या झोपडप˜ीला ग्रामपंचायतीने सुविधा गेल्या पाच वर्षात करून दिल्या आहेत. या झोपड्यांना नवी झळाळी मिळाली झोपड्या वाढण्यासाठी पर्याय या जागेवर नसल्याने निफाडरोडच्या मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला झोपड्या वाढवून येथील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अत्यंत धोकेदायक असा या भागातील रस्ता बनला आहे. शिर्डी-सूरत मुख्य रस्ता असल्याने याठिकाणी लहान मुले, मोठी माणसे अगदी रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहन चालकाला येथुन जिवमुठीत धरून चालावे लागते. रस्त्यावर येणारी झोपडप˜ी वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी झोपड्या विक्री करून पिंपळगावात अन्य ठिकाणी पुन्हा नव्याने झोपड्या उभ्या केल्या. अशीच परिस्थिती उंबरखेडरोड वरील कॉलेज लगत झोपड्यांची झाली आहे. या ठिकाणचे झोपडप˜ी रहिवासींना ग्रामपंचायतीने फिरते शौचालय दिले होते. त्याला काही दिवसच त्या शौचालयाचा वापर झाला. येथील नागरिक कॉलेजसमोर महामार्गावरच शौचालयाचा उघड्यावर वापर करतात. कॉलेजला जाणारे विद्यार्थी तोंड शाबुत ठेवुन जातात. या ठिकाणच्या ??? कॉलेजपर्यंत जाते. तसेच भिडेनगरमधील रहिवाशी तर या त्रासाने लाखो रूपयांचे फ्लॅट विकुन अन्य जागेवर स्थलांतरीत झाले. यामुळे या ठिकाणच्या जमीनीचे भावदेखील कमी झाले आहे. असाच प्रकार देवीचा माथा, हनुमाननगर, सावरटेक, वणीरोड आदी ठिकाणी झाला आहे. या झोपडपट्यामधील बहुतांशी नाशिक मतदार असल्याने पाच वर्षे सत्ता भोगावयाची असल्यामुळे प्रशासनात काम करणारे लोकप्रतिनिधी प्रथम झोपडप˜ीच्यांच मतांना प्राधान्य देते येथील मतदार हे दरवेळी मतदान करतात मग त्यांना का हलवायचे पालिका गेले तर लोकप्रतिनिधींना या झोपडप˜ीतील मतदारांवर ग्रामपंचायत सारख्या निवडणुकीत लाखो रूपये