शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

सुधारीत घेणे ... सांगा कसं जगायचं

By admin | Updated: May 9, 2014 21:13 IST

सचिन भोसले - कोल्हापूर : गेले ३६ महिने राज्यातील ज्येष्ठ कुस्तीगीरांना शासनाचे मानधनच न मिळाल्याने ही ज्येष्ठ मंडळी आर्थिक अडचणीत आली आहेत. मानधन न मिळाल्याने उर्वरित आयुष्याची संध्याकाळ कशी घालवायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

सचिन भोसले - कोल्हापूर : गेले ३६ महिने राज्यातील ज्येष्ठ कुस्तीगीरांना शासनाचे मानधनच न मिळाल्याने ही ज्येष्ठ मंडळी आर्थिक अडचणीत आली आहेत. मानधन न मिळाल्याने उर्वरित आयुष्याची संध्याकाळ कशी घालवायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
गेले ३६ महिने राज्यातील हिंदकेसरी, डबल महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी आदी स्पर्धांमध्ये यश मिळवून राज्याचा नावलौकीक वाढविणार्‍या ज्येष्ठ व वयाने साठी ओलांडलेल्या मल्लांना १९९५-९६ मध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्या युतीच्या काळात व मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यामुळे दरमहा मानधन देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला गेला व त्यास सर्वपक्षियांनी अनुमती दिली. १९९६ मध्ये सुरू झालेले मानधन अगदी विना थकीत अगदी मे २०११ पर्यंत मिळाले. मात्र, अचानकपणे राज्य शासनाने आजतागायत हे मानधन अद्यापही दिलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ मल्लांना या मानधनावरच आपला उदरनिर्वाह करावा लागत असल्याने अगदी ही ज्येष्ठ मंडळी काकुळतीला आली आहेत. त्यामुळे गेले ३६ महिने थकविलेले मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी या ज्येष्ठ मल्लांकडून होत आहे. या मल्लांकडून अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी मी त्वरीत मानधन सुरू करतो. म्हणून गेल्यावर्षी सांगितले होते. तत्काळ मी तुमच्या सर्व मल्लांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी गाठ घालून देतो असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन आतापर्यंत या मंडळीनी पाळलेले नाही. अगदी परवापर्यंत जिल्‘ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या ज्येष्ठ मल्लांच्या थकीत मानधनाविषयी क्रीडा खात्याकडे पाठपुरावा करून तातडीने मानधन देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासनही हवेत विरले की, काय असा सवाल आता या ज्येष्ठ मल्लांकडून विचारला जात आहे. त्यामुळे सांगा कसं जगायचं असा सवाल या मल्लांकडून विचारला जात आहे.
-----
आयुष्यभर कष्ट आणि उतारवयात आजारपण
आयुष्यभर कुस्ती आणि कुस्तीच याचा विचार करून केवळ तालमीत सराव करायचा या उद्देशाने काही मल्लांनी आपले घरदार सोडून तालीम हीच आपली आई व घर म्हणून आपले सर्वस्व पणाला लावले होते. तारुण्यात अनेक मैदाने या मल्लांनी गाजविली. मात्र, उतारवयात उदरनिर्वाह चालण्यासाठी शासनाने दिलेल्या या मानधनावर काही ज्येष्ठ मल्ल उदारनिर्वाह करत आहेत. मात्र मानधनच न मिळाल्याने हे मल्ल हवालदिल झाले आहेत.
-----
कोट
गेली ३६ महिने राज्य शासनाने मानधन थकविल्याने आमच्यासारख्या वृद्ध मंडळींचा उदरनिर्वाह कसा करायचा प्रश्न निर्माण झाला आहे. उतारवयात अनेक व्याधी व उदरनिर्वाह कसा चालवायचा या काळजीने अनेक मल्ल हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आमच्या ज्येष्ठ मल्लांना त्वरित थकलेले मानधन मिळाले तरी जगणे सुस‘ होईल. माझे वैयक्तिक राज्य शासनाने १ लाख ९२ हजार रुपये थकविले आहेत. त्यामुळे माझ्याबरोबर इतरांचेही मानधन लवकर मिळाले तर बरे होईल.
- ज्येष्ठ मल्ल हिंदकेसरी दीनानाथसिंह
----------
मानधनाचे बजेटच अपुरे
राज्य शासनाने क्रीडा खात्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणार्‍या मल्लांना देण्यात येणारे निधी अपुरा मंजूर केला होता. त्यामुळे गेले तीन वर्षे हे मानधन रखडले होते. याचबरोबर रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्येष्ठ खेळाडूंची संख्या वाढत आहे येणारा निधी अपुरा आहे. त्यामुळ े हे मानधन या ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र, येत्या आठ दिवसांत हे मानधन थेट या खेळाडूंच्या नावावर बँकेत जमा करण्यात येणार असून या प्रस्तावावर नुकतीच राज्याचे क्रीडा संचालकांनी सही केली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे यांनी दिली.