सुधारित/ नावेद/ लाय डिटेक्टर नावेदची घेतली लाय डिटेक्टर टेस्ट दोन साथीदारांचे रेखाचित्र जारी : प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
नवी दिल्ली : उधमपूर हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याची मंगळवारी लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली. दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)
सुधारित/ नावेद/ लाय डिटेक्टर नावेदची घेतली लाय डिटेक्टर टेस्ट दोन साथीदारांचे रेखाचित्र जारी : प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस
नवी दिल्ली : उधमपूर हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याची मंगळवारी लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली. दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्या दोन फरार साथीदारांची रेखाचित्रे जारी केली आहेत. नावेदचा साथीदार झारघन ऊर्फ मोहम्मद भाई हा ३८ ते ४० वर्षांचा तर अबू ओकाशा हा १७ ते १८ वर्षांचा आहे. एनआयएने या दोघांच्या अटकेसाठी माहिती पुरविणाऱ्यांना प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीसही जाहीर केले.नावेदने भारतातील त्याचा संपर्क आणि त्याने कोणत्या मार्गाने घुसखोरी केली याबाबत दिशाभूल केल्यामुळे त्याची लाय डिटेक्टर टेस्ट पार पाडण्यात आली. दिल्ली न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार त्याला मंगळवारी सकाळी केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (सीएफएसएल) आणण्यात आल्यानंतर काही वेळ एकटे ठेवण्यात आले होते. या चाचणीच्यावेळी गुप्तचर संस्थेसह विविध तपास संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.५ ऑगस्ट २०१५ रोजी जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे अतिरेक्यांनी बीएसएफच्या वाहनावर हल्ला केला होता. हल्ला करण्याच्या हेतूने लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी गुलमर्ग भागातून भारतीय हद्दीत प्रवेश केल्याची माहिती मिळाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. उपरोक्त दोन अतिरेक्यांच्या ठावठिकाण्यांबाबत विश्वसनीय माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल त्याचवेळी त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे एनआयएने स्पष्ट केले आहे.(वृत्तसंस्था) ----------------------------------विसंगत उत्तरेया चाचणीसाठी नावेदची लेखी परवानगी घेण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांच्या गटाने प्रवेश केला. तो दोन महिन्यांच्या वास्तव्यात कुणाकुणाला भेटला, यासारखे प्रश्न नावेदला विचारण्यात आले. या चाचणीपूर्वी त्याने किती जणांसोबत घुसखोरी केली आणि तो कोणत्या मार्गाने भारतात आला याबाबत त्याने वेगवेगळी विसंगत उत्तरे दिली. तो नोमान या ठार झालेल्या अतिरेक्यासोबत ४ ऑगस्ट रोजी जम्मू- श्रीनगर महामार्गावरील टमाटर मोध येथे ज्या वाहनातून आला त्याच्या नंबर प्लेटबाबतही त्याने चुकीची माहिती दिली होती, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.