महत्त्वाचे- कांद्यात घसरण
By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST
लासलगावमध्ये कांदा ४८ रुपये किलो !- घाऊकमध्ये घसरण : नाशिक : एकीकडे मुंबईत इजिप्तचा व पुण्यात कर्नाटकचा कांदा दाखल झाल्यानंतर लासलगावमध्ये घाऊक बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. मंगळवारी लासलगावमध्ये कांद्याला क्विंटलमागे ४,८५० रूपये भाव मिळाला तर सटाण्यात ५,२०० रूपये भाव होता. उन्हाळ कांद्याने क्विंटलमागे सहा हजारांचा टप्पा पार केल्यामुळे ...
महत्त्वाचे- कांद्यात घसरण
लासलगावमध्ये कांदा ४८ रुपये किलो !- घाऊकमध्ये घसरण : नाशिक : एकीकडे मुंबईत इजिप्तचा व पुण्यात कर्नाटकचा कांदा दाखल झाल्यानंतर लासलगावमध्ये घाऊक बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. मंगळवारी लासलगावमध्ये कांद्याला क्विंटलमागे ४,८५० रूपये भाव मिळाला तर सटाण्यात ५,२०० रूपये भाव होता. उन्हाळ कांद्याने क्विंटलमागे सहा हजारांचा टप्पा पार केल्यामुळे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्यात केलेली वाढ आणि प्रशासनाने व्यापार्यांकडील साठ्यांची केलली तपासणी या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी कांदा भाव कोसळले. शनिवारी जिल्ह्यात कांद्याला ६,२५५ रूपये भाव मिळाला. त्यानंतर दोनच दिवसांत कांदा हजार रु पयांनी घसरला. (प्रतिनिधी)