शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाचे -डॉ.नरेंद्र जाधव यांची संघावर स्तुतिसुमने!

By admin | Updated: April 15, 2015 00:46 IST

नरेंद्र जाधव यांची संघावर स्तुतिसुमने!

नरेंद्र जाधव यांची संघावर स्तुतिसुमने!
म्हणाले, संघ व दलितंमधील मी दुवा
रघुनाथ पांडे/नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निकटवर्ती तसेच नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर भलामण केल्याने राजकीय क्षेत्रात भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी संघ व दलित यांच्या एकीसाठी आपण कारण ठरल्यास आनंद होईल, असे विधान केले.
राजधानीत एकीकडे वादग्रस्त विधानांची स्पर्धा लागली असतानाच आता जाधव यांच्या विधानाने त्यात भर पडली आहे.
निमित्त होते संघ परिवारातील दोन पाक्षिकांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विशेषंकाच्या लोकार्पणाचे. मंगळवारी सीरी फोर्ट सभागृहात संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी, डॉ. नरेंद्र जाधव, पत्रकार प्रफुल केतकर, हितेश कुमार यांच्या उपस्थित हा कार्यक्र म झाला. त्यावेळी जाधव यांनी संघाला पूरक अशी आपली मते मांडल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले.
जाधव म्हणाले, संघाला डॉ.आंबेडकर आधीच प्रात:स्मरणीय आहेत. बाबासाहेबांचे विचार समाजासाठी आवश्यक आहेत. ते सांगायला मी येथे आलो. माझ्या काही मित्रांना संघाच्या या कार्यक्र मात मी सहभागी होतो, असे कळल्यानंतर आपत्ती होती. परंतु चांगल्या कार्यक्र मात सहभागी होण्यासाठी मला कुणाची परवानगी लागत नाही. मी त्यांची पर्वा करत नाही. जयंतीच्या निमित्ताने संघाच्या मंचावर मी डॉ. आंबेडकर यांचे विचार सांगतो आहे, यापेक्षा चांगली गोष्ट नाही , असेही ते म्हणाले.
सरकार्यवाह भैयाजी जोशी म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्याआधी १० वर्षे मदर तेरेसा यांना भारतरत्न दिले गेले; ही बाब योग्य नाही. देशात दोन डॉक्टरांनी महत्वाची भूमिका पर पाडली. दोघांनी समाजाची चिकीत्सा केली; दोघांनी समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ.आंबेडकर संघाला पूज्य आहेत. या देशात बाबासाहेबांच्या विचारांची आजवर उपेक्षा झाली़ यापुढे संघ ते विचार तळागाळात पोहचवेल.
यावेळी सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी बाबासाहेबांना एका वर्गापर्यंत मर्यादित ठेवणे चुकीचे आहे, असे सांगून त्यांच्या विचारांचा विस्तार करू, असे म्हटले.