शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शाही इमामांघरी हिंदू सून

By admin | Updated: November 11, 2015 02:57 IST

वाढत्या सांप्रदायिक असहिष्णुतेवरून देशभर वादंग उठले असतानाच, दिल्लीच्या जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे चिरंजीव व उत्तराधिकारी शाबन बुखारी यांनी एका हिंदू मुलीशी विवाह केल्याचे वृत्त

नवी दिल्ली : वाढत्या सांप्रदायिक असहिष्णुतेवरून देशभर वादंग उठले असतानाच, दिल्लीच्या जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे चिरंजीव व उत्तराधिकारी शाबन बुखारी यांनी एका हिंदू मुलीशी विवाह केल्याचे वृत्त अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी मंगळवारी दिल्याने एकच खळबळ उडाली. शाही इमामांनी सूनबार्इंना इस्लाम कुबूल करायला लावून, मगच घरात घेण्याऐवजी तिला तिच्या जन्मजात धर्माचे पालन करू दिले असते, तर देशात एक आश्वासक संदेश गेला असता, असा अनेकांचा सूर होता.२० वर्षांच्या शाबन बुखारी यांचा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका हिंदू मुलीशी प्रेमविवाह होणार असल्याच्या बातम्या गेला आठवडाभर चर्चेत होत्या. येत्या १३ नोव्हेंबरला विवाह व १५ नोव्हेंबरला स्वागत समारंभ होणार असल्याचे त्यावेळी म्हटले गेले. मात्र, जामा मशिदीचे कार्यालय प्रमुख अमानुल्ला यांनी ‘लोमकढी थाप’ असे म्हणून एका उर्दू वृत्तपत्राकडे याचा इन्कार केला होता. शाबन यांचा विवाह होणार आहे हे खरे, पण वाग्दत्त वधू हिंदू नव्हे, तर एका श्रद्धाळू मुस्लीम कुटुंबातील आहे व ती स्वत: इस्लामी धर्मशास्त्राची अभ्यासक आहे, असे त्यांचे म्हणणे होते, पण हा विवाह पार पडल्याच्या बातम्या मंगळवारी सर्वत्र पसरल्यावर मात्र, शाही इमामांचे कुटुंब अथवा जामा मशिदीकडून रात्रीपर्यंत तरी त्याचा इन्कार केला गेला नव्हता. प्रसिद्धीमाध्यमांनी अनाम सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या रविवारी सायंकाळी जामा मशिदीमध्ये निवडक नातेवाईक व कुटुंबीयांच्या उपस्थितीत शाबन यांचा विवाहसोहळा पार पडला. सय्यद अहमद बुखारी यांचा या आंतरधर्मीय विवाहाला प्रारंभी विरोध होता, परंतु हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर मात्र त्यांचा विरोध मावळला, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, शाबन आणि हिंदू मुलीदरम्यान गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि या दोघांच्याही कुटुंबीयांकडून विवाह करण्याला जोरदार विरोध झाला होता. ही मुलगी गाझियाबादची राहणारी असून, ती इस्लामचा अभ्यास करीत असल्याचे समजते. दिल्लीतील जामा मशीद ही देशातील सर्वात मोठी मशीद असली आणि तेथील इमाम ‘शाही’ अशी बिरुदावली मिरवत असले, तरी आताच्या भारतात ते मुस्लिमांचे प्रमुख इमाम अशी स्थिती राहिलेली नाही. मोगल सम्राटांचे दिल्लीत शासन असताना त्यांनी स्वत:ला नमाज पढण्यासाठी जामा मशीद बांधली व तेथे इमाम नेमले म्हणून ते ‘शाही इमाम’ असे ओळखले जाऊ लागले. शहेनशाही गेली तरी इमामपद बुखारी कुटुंबाकडे वारसाहक्काने कायम राहिले व ‘शाही’ ही किताबतही.