प्राणीजन्य रोग दिनानिमित्त भटक्या कुत्र्यांचे लसीकरण
By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST
पुणे : जागतिक प्राणीजन्य रोग दिनानिमित्त महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील साडे तीनशे भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना ॲन्टी रेबीजचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांना रेबीज होण्यापासून प्रतिबंध होणार आहे.
प्राणीजन्य रोग दिनानिमित्त भटक्या कुत्र्यांचे लसीकरण
पुणे : जागतिक प्राणीजन्य रोग दिनानिमित्त महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील साडे तीनशे भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना ॲन्टी रेबीजचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांना रेबीज होण्यापासून प्रतिबंध होणार आहे.महापालिकेच्या कोथरूड, संगमवाडी, ढोले पाटील, सहकारनगर, धनकवडी यो क्षेत्रिय कार्यालयांमध्ये ही लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अरविंदे शिंदे, उपआरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे उपस्थित होते. कोथरूड अंतर्गत ६५, संगमवाडीमध्ये ७६, ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत ७५, सहाकार नगरमध्ये ६०, धनकवडीमध्ये ७२ कुत्र्यांना लसीकरण करण्यात आले. लसीकरण करण्यात आल्यानंतर कुत्र्यांच्या डोक्यावर विशेष खून म्हणून लाल रंगाचा पटट मारण्यात आला आहे. लसीकरणानंतर कुत्र्यांना परत त्यांच्याच भागात सोडण्यात आले...............धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून ३ लाखांची औषधे भेटपुणे : रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून पुणे महापालिकेला ३ लाख रूपयांची ॲलोपॅथी औषधे भेट देण्यात येणार आहेत. गोर गरीब व गरजू रूग्णांपर्यंत ही औषधे पोहचून त्यांचे जीवन आरोग्यदायी व्हावे या हेतूने या औषधांचे वाटप करण्यात येत असल्याचे उमेश धर्माधिकारी यांनी सांगितले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ महापालिकेला ही भेट देण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत...............