शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे एटीएम कार्ड दुसऱ्याला वापरण्यास देणे बेकायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:52 IST

अनेक जण आपले एटीएम कार्ड आणि त्याचा पिन क्रमांक दुसºयाला देतात आणि पैसे काढून आणायला सांगतात. पण तसे करणे बेकायदा आहे, हे न्यायालयाने मान्य केले आहे.

बंगळुरू : अनेक जण आपले एटीएम कार्ड आणि त्याचा पिन क्रमांक दुसºयाला देतात आणि पैसे काढून आणायला सांगतात. पण तसे करणे बेकायदा आहे, हे न्यायालयाने मान्य केले आहे. प्रत्यक्ष खातेदाराशिवाय अन्य कोणीही एटीएम कार्ड वापरणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.बँकेच्या नियमांनुसार एटीएम कार्ड अन्य कोणालाही वापरता येणार नाही, हे स्टेट बँकेचे म्हणणे मान्य करून बंगळुरूतील न्यायालयाने प्रसूतीसाठी रजेवर असले्या महिलेची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बंगळुरूमध्ये राहणाºया वंदना नावाच्या महिलेने प्रसूती रजेवर असताना, आपले पती राजेशकुुमार यांना आपले एटीएम कार्ड देऊ न पैसे काढायला सांगितले होते.राजेशकुमार घराजवळच्या एटीएममध्ये गेले आणि त्यांनी २५ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तसे करताच, वंदना यांच्या मोबाइलवर पैसे काढण्यात आल्याचा मेसेज आला. पण प्रत्यक्षात राजेशकुमार यांना एटीएममधून पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे वंदना व राजेशकुमार यांनी स्टेट बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून याची माहिती दिली. त्यावर तुम्हाला ती रक्कम मिळाली नसेल, तर २४ तासांत ती तुमच्या खात्यात पुन्हा जमा होतील, असे सांगण्यात आले.पण पैसे खात्यात पुन्हा जमा झालेच नाही. त्यामुळे त्या दोघांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे ही तक्रार केली. त्यावर बँकेने आपला नियम दाखवला आणि तुम्ही बेकायदा पद्धतीने तुमचे कार्ड दुसºया व्यक्तीस दिले होते. त्यामुळे ही रक्कम तुम्हाला पुन्हा मिळू शकणार नाही, असे उत्तर त्यांना दिले. आपण गरोदर असल्याने आपणास प्रत्यक्ष बँकेत वा एटीएममध्ये जाणे शक्य नव्हते, हे वंदना यांचे म्हणणेही बँकेने ऐकून घेतले नाही.त्यावर या दाम्पत्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तिथे त्यांनी आपली २५ हजार रुपयांची रक्कम बँकेने परत करावी, असा अर्ज केला. या अर्जातही त्यांनी आपण गरोदर असल्याने पैसे काढण्यासाठी कार्ड पतीला दिले होते, हे मान्य केले होते. दरम्यान वंदना यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून संबंधित एटीएम व्यवहाराची माहिती मिळवली.त्यात त्या दिवशी संबंधित एटीएम कार्डचा वापर करणाºया व्यक्तीस २५ हजार रुपये दिले गेले नाहीत आणि ती रक्कम त्या यंत्रात तशीच राहिली, अशी माहिती मिळाली. सीसीटीव्हीचे फुटेज व माहिती अधिकारातून मिळालेली माहिती वंदना यांनी ग्राहक न्यायालयात सादर केली. (वृत्तसंस्था)धनादेश द्यायला हवा होतामात्र बँकेने एटीएम कार्डाविषयीचे नियम न्यायालयात सादर केले. हे कार्ड दुसºयास वापरण्यास देणे तसेच पिन क्रमांक सांगणे बेकायदा असल्याचा हा नियम आहे. तो न्यायालयाने मान्य केला.एटीएम कार्डाऐवजी पतीला धनादेश द्यायला हवा होता, तसे केले असते तरी आपणास पैस मिळाले असते. पण आपण बेकायदा मार्गाचा अवलंब केला, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे वंदना यांना स्वत:च्या खात्यातील तब्बल २५ हजार रुपयांना मुकावे लागले.

टॅग्स :atmएटीएम