शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

देशात राहायचे असल्यास गोमांस खाणे सोडावे

By admin | Updated: October 16, 2015 23:43 IST

मुस्लिम या देशात निश्चिंतपणे राहू शकतात; पण यासाठी त्यांनी गोमांस खाणे सोडावे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपशासित हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे.

चंदीगड : मुस्लिम या देशात निश्चिंतपणे राहू शकतात; पण यासाठी त्यांनी गोमांस खाणे सोडावे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपशासित हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. अर्थात हा वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून माफी मागण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.हरियाणातील खट्टर सरकारला महिनाअखेर एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत खट्टर यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. भारतात गाय ही पूज्य आहे. गायीला देशातील एक मोठा समाज पवित्र मानतो. याचाच विचार करून मुस्लिमांनी गोमांस खाणे सोडले पाहिजे. मुस्लिम या देशात निश्चिंतपणे राहू शकतात; पण त्यांनी गोमांस सोडावे, असे खट्टर या मुलाखतीत म्हणाले. उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडाचा उल्लेख करून, दादरीत जे काही घडले ते चुकीचे होते. केवळ गैरसमजातून ही घटना घडली, असेही खट्टर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर खट्टर सावरासावर करताना दिसले. शुक्रवारी याबाबत बोलताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मी असे बोललोच नाही. मात्र याउपरही माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागण्यास तयार आहे, असे खट्टर म्हणाले.>>हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फोडले असतानाच भाजपने मात्र यापासून स्वत:ला नामानिराळे केले. खट्टर जे काही बोलले, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. भाजपची ही भूमिका नाही. मी त्यांच्याशी यासंदर्भात बोलेन. आपल्या वक्तव्याने दुसऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचे प्रत्येकाने भान राखायला हवे.>>>>>विरोधकांकडून तीव्र शब्दांत सरकारची निंदानवी दिल्ली/ श्रीनगर : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्याचे शुक्रवारी देशभर तीव्र पडसाद उमटले. हा देशाच्या लोकशाहीतील सर्वात दु:खद दिवस आहे. आता हरियाणाचे मुख्यमंत्री भारतीय नागरिकत्वासाठीची पात्रता ठरवणार का? हे मोदी शासनाचे नवे मॉडेल आहे का? असा खरपूस सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.काँग्रेसचे अन्य एक नेते राशीद अल्वी यांनीही खट्टर यांचे विधान घटनाबाह्य असल्याचे सांगत त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. (वृत्तसंस्था)