शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

नाव फुटकी असल्यास पाण्यामध्ये बुडणारच!

By admin | Updated: July 20, 2016 05:26 IST

लोकनियुक्त सरकारे पाडण्यात भाजप व त्याच्या केंद्रातील सरकारचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी फेटाळून लावला.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील लोकनियुक्त सरकारे पाडण्यात भाजप व त्याच्या केंद्रातील सरकारचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी फेटाळून लावला. नावेला छिद्र असेल, तर ती पाण्यात बुडणारच. पाण्याला दोष देणे बरोबर नाही, अशा शब्दांत राजनाथ यांनी उत्तराखंड व अरुणाचलमधील संकटाचे माप काँग्रेसच्या पदरात टाकले. काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून हा प्रकार घडल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, काँग्रेसमुक्त भारताची घोषणा घेऊन सत्तेचा दुरुपयोग करीत लोकनियुक्त सरकारे पाडली जात आहेत. मणिपूर, हिमाचल प्रदेश येथील सरकारेही पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. राज्यघटना व लोकशाही तत्त्वाला फाटा देऊन जेथे बहुमत नाही तेथेही तोडफोड करून सरकार बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला असूनही सरकार बोध घ्यायला तयार नाही. या मुद्यावर काँग्रेसने स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी तो फेटाळत शून्य प्रहरात खरगे यांना म्हणणे मांडण्याची मुभा दिली. खरगे सरकारवर हल्ला करीत असताना सभागृहात अनेकदा गोंधळ झाला. खरगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना राजनाथसिंह यांनी सरकारचा भक्कमपणे बचाव केला. या प्रकरणात केंद्राची काहीही भूमिका नाही. त्यामुळे याबाबत केंद्रावर आरोप करणे ठीक नाही. काँग्रेस सरकारने आतापर्यंत १०५ वेळा कलम ३५६ चा वापर करून राज्य सरकारे पाडली आहेत. गृहमंत्र्यांच्या या निवेदनाला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे सदस्य गौरव गोगाई म्हणाले की, येथे कलम ३५६ चा वापर करून सरकार पाडण्याच्या मुद्यावर चर्चा सुरू नसून केंद्राने राज्य सरकारे पाडण्यास राज्यपालांसारख्या घटनात्मक पदाचा कसा दुरुपयोग केला यावर चर्चा सुरू आहे. >केरळच्या २१ बेपत्ता लोकांचा मुद्दा लोकसभेतकेरळमधून बेपत्ता झालेल्या व दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये (आयएस) सहभागी झाल्याचा संशय असलेल्या २१ जणांचा मुद्दा मंगळवारी लोकसभेत राज्यातील सदस्यांनी उपस्थित केला. हे बेपत्ता लोक बंदी असलेल्या कोणत्याही संघटनेत दाखल झाले आहेत का याची खातरजमा सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली. काही दहशतवादी संघटनांमध्ये हे बेपत्ता लोक सामील झाल्याची खात्री न मिळालेली वृत्ते प्रसारमाध्यमांत आली आहेत. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनच त्याला दुजोरा मिळवून घ्यावा, असे काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल म्हणाले. इस्लामची भीती घालण्याचा हेतुत: प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.