शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांनी अत्याचार केल्यास मी हिंदूंच्या पाठीशी!

By admin | Updated: November 13, 2015 00:09 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकमधील हिंदूंना बुधवारी दिवाळीच्या भेटीदाखल त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकमधील हिंदूंना बुधवारी दिवाळीच्या भेटीदाखल त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले. तुमच्यासोबत काहीही होत असेल आणि अत्याचार करणारा मुस्लीम असेल तर मी हिंदूंच्या पाठीशी उभा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.शरीफ यांनी बुधवारी हिंदूंनी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमास हजेरी लावली. या कार्यक्रमाला उपस्थित हिंदू समुदायास नवाज यांनी सुरक्षेचे आश्वासन दिले. पाकिस्तानी मीडियाने गुरुवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. मी कुण्या एका धर्माचा पंतप्रधान नाही. माझ्या देशात कुठल्याही धर्म वा समुदायावर अत्याचार होत असेल तर त्याची मदत करणे माझे कर्तव्य आहे. हिंदूंविरुद्ध अत्याचार झाला आणि अत्याचार करणारा मुस्लीम असला तरी त्याच्याविरुद्ध कारवाई होईल. कारण माझा धर्म मला हेच शिकवतो. केवळ इस्लामच नाही तर जगाच्या पाठीवरील सर्व धर्म हीच शिकवण देतात. अत्याचार करणाऱ्याची नाही तर पीडिताची मदत करा, त्याच्या पाठीशी उभे राहा, हेच सर्व धर्म सांगतात, असे शरीफ यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. आपण सर्व एका देशाचे नागरिक आहोत. तेव्हा शक्य तेवढी एकता निर्माण करा. परस्परांना मदत करा. भेदभाव अल्लालाही मान्य नाही, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.