शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मूर्दापूर धरणाची उंची वाढल्यास नशिराबादला पाणीच पाणी

By admin | Updated: May 8, 2016 23:08 IST

नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्‍याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्‍याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
येथून जवळच मूर्दापूर धरण आहे. मूर्दापूर धरणाची उंची वाढवावी, असा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी काम अपूर्णच असल्याने पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून जाते. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत असून एमआयडीसचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. धरणाची उंची तीन मिटरने वाढवावी, अशी मागणी गेल्याच महिन्यात पालकमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. धरणाचीपाणी साठवण क्षमता ११० दशलक्ष घनफुट आहे. शेतकर्‍यांच्या मागणीमुळे शासनाने उंची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यात भराव्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र बुडीत क्षेत्रातील जाणार्‍या शेतीचे भूसंपादनाचा मोबदला त्वरित मिळावा अशी मागणी होत आहे. उंची वाढ झाल्यास धरणाची साठवण क्षमता २३९ दशलक्ष घनफुट होणार आहे. त्यामुळे नशिराबादला मुबलक पाणी मिळणार आहे. एमआयडीसीकडे धाव घ्यावी लागणार नाही.
उंची वाढीमुळे शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यापूर्वीच वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी उंची वाढ व्हावी, अशी मागणी ग्रामसभेत करुन ठराव करण्यात आला आहे. विजय भानुदास सरोदे हे सूचक असून सदस्य लालचंद प्रभाकर पाटील, अनुमोदक आहे. ग्रामसभेत सर्वांनी या ठरावास सर्वानुमते मंजुरी मिळाली असून लघुपाटबंधारे विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे.