शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श अंगणवाडी सेविका-मदतनीस पुरस्काराचा संपेना घोळ

By admin | Updated: March 24, 2015 23:50 IST

बुधवारी पुरस्कार वितरण, सायंकाळी उशिरा केली घोषणा

बुधवारी पुरस्कार वितरण, सायंकाळी उशिरा केली घोषणानाशिक : आदर्श ग्रामसेवक व उत्कृष्ट अभियंता पुरस्कारापाठोपाठ आता आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कारांचा घोळ पुरस्कार वितरणाच्या पूर्वसंध्येपर्यंत सुरूच असल्याचे चित्र होते. सायंकाळी उशिरा ७८ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.बुधवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता या पुरस्कारांचे वितरण तिडके कॉलनी येथील ग्रामसेवक भवन येथे अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, किरण थोरे, उषा बच्छाव, शोभा डोखळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, महिला व बालकल्याण समितीचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. आदर्श अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी तीन हजार, तर आदर्श अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, आदर्श पर्यवेक्षिका यांना केवळ सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांनी सांगितले. आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका प्रत्येकी २६ असे एकूण ७८ पुरस्कार देण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांची निवड करण्यासाठी १०० गुणांचा निकष ठेवण्यात आला होता. त्याचे गुणदान त्या त्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी देऊन निवड केलेल्या आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका निवडीवर सभापती शोभा सुरेश डोखळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांनी शिक्कामोर्तब केले असले, तरी ही निवड पुरस्कार वितरण करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होती. सायंकाळी उशिरा या निवड केलेल्या ७८ कर्मचार्‍यांच्या प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची स्वाक्षरी घेण्यात आल्याने निवडीचा घोळ सुरूच असल्याचे चित्र होते.(प्रतिनिधी)