इचलकरंजीत कापड गोदामास भीषण आग
By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST
इचलकरंजी : येथील वखारभाग परिसरात असलेल्या भिकुलाल दगडूलाल मर्दा यांच्या कापडाच्या दुमजली गोदामाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत सुमारे १० कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटेच्या सुमारास लागलेली आग सुमारे दहा तासांपर्यंत धुमसत होती.
इचलकरंजीत कापड गोदामास भीषण आग
इचलकरंजी : येथील वखारभाग परिसरात असलेल्या भिकुलाल दगडूलाल मर्दा यांच्या कापडाच्या दुमजली गोदामाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत सुमारे १० कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटेच्या सुमारास लागलेली आग सुमारे दहा तासांपर्यंत धुमसत होती.शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गोदामातून धूर व आगीचे लोट येत असल्याचे रखवालदार व शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. गोदामात मोठ्या प्रमाणात पॅकिंग कापडाचे गठ्ठे असल्याने आग मोठ्या प्रमाणात फैलावत गेली. इचलकरंजीसह कोल्हापूर महापालिका, जयसिंगपूर, वडगाव नगरपालिका, घोडावत उद्योग समूह, जवाहर साखर कारखाना, दत्त कारखाना, पंचगंगा कारखाना, पार्वती औद्योगिक वसाहत, आदी ठिकाणचे अग्निशमन दल बंबासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आग विझवली.