शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मी भाजपमध्येच रहाणार - नवज्योत कौर सिद्धू

By admin | Updated: July 19, 2016 12:07 IST

भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धूच्या राजीनाम्याच्या मुद्यावर त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धूने मंगळवारी मौन सोडले.

ऑनलाइन लोकमत 

चंदीगड, दि. १९ -  भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धूच्या राजीनाम्याच्या मुद्यावर त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धूने मंगळवारी मौन सोडले. सिद्धू यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पण मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकलेले नाही. मी भाजपमध्येच रहाणार आहे असे नवज्योत कौर सिद्धूने स्पष्ट केले. 
 
नवज्योत कौर सिद्धू पंजाब विधानसभेमध्ये भाजपच्या आमदार आहेत. संसदीय सचिव असल्याने त्यांना पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यासारखा दर्जा आहे. मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करत आहे असे नवज्योत कौर सिद्धू यांनी सांगितले. 
 
सिद्धू यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, माझ्या पतीला पंजाबची सेवा करायची आहे. सिद्धू यांचा शिरोमणी अकाली दलाला पाठिंबा नव्हता. त्यांचे वेगळे विचार होते. पक्षाने शिरोमणी अकाली दलाबरोबर विधानसभा निवडणूक लढवायाचा निर्णय घेतला. याचा अर्थ पक्ष त्यांच्या मताचा आदर करत नाही हे स्पष्ट होते असे नवज्योत कौर सिद्धू यांनी सांगितले. 
 
लवकरच पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार असून, २००७ पासून पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपचे सरकार आहे. भाजपला रामराम करणारे सिद्धू पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे.